Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानच्या कोटा येथील अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू; 6 जण जखमी

कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास शंभूपुरा गावाजवळ झाला. जेव्हा भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रूझर वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकशी धडक झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2026 | 11:10 AM
राजस्थानच्या कोटामध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

राजस्थानच्या कोटामध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला.
  • या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

जयपूर : कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मुलांसह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजस्थानमधील कोटा येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकशी धडक होऊन मोठा अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.

कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास शंभूपुरा गावाजवळ झाला. जेव्हा भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रूझर वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकशी धडक झाली. मृतांमध्ये उषा बाई, सुशीला, कैलाश, सान्वी, सज्जन, अनिता, बाबूलाल, जान्हवी आणि माधवी यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या सहा जणांना रुग्णवाहिकेने न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या वाहनात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील १५ सदस्य प्रवास करत होते. ते सर्वजण खाटू श्यामजींना भेटून राजस्थानहून परत येत होते. प्राथमिक अहवालानुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. गाडी चालवताना त्याला डुलकी लागल्याचे वृत्त आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

पहाटे २ वाजण्याच्या सुमारास शंभूपुरा गावाजवळ कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या एका क्रूझर वाहनाची धडक बसली. वाहन भरधाव वेगात असल्याने धडक जोरदार होती. या दुर्घटनेत नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले.

जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

पीडितांच्या देखभालीसाठी रुग्णालयात एक वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीएम-शहर) यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले.

FAQ

1. राजस्थानमध्ये भीषण अपघात कुठे झाला?

राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ हा अपघात झाला.

2. अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

3. अपघातात किती जण जखमी झाले?

या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Horrific accident in kota rajasthan 9 members of the same family killed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Accident News
  • Rajasthan Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.