मुंबई : अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटीलला (Lalit Patil) नुकतचं चेन्नईतुन अटक करण्यात आली. तो पुण्यातील ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्याला आज मुंबई पोलिस तपासणीसाठी घेऊन जात असताना त्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं गेल्याचं त्याने मीडियासमोर म्हण्टलं आहे. या सगळ्या मागे कोण आहे, ते सर्व सांगणार असंही ललित पाटील म्हणाला आहे.
[read_also content=”चेन्नईत गेला, एक फोन केला अन् तेथेच फसला; ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतून अटक https://www.navarashtra.com/maharashtra/drug-mafia-lalit-patil-arrested-from-chennai-nrka-471417.html”]
चेन्नईतून ललित पाटीलला ताब्यात घेतल्यानंतर आज त्याला मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात तपासणीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याने पोलीसांच्या गाडीत बसण्याअगोदर प्रतिक्रिया दिली आहे. मी लवकरच मीडियाशी बोलेल . मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं आहे. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे, हे लवकरच सांगणार आहे, असे ललित पाटील एबीपी माझ्याच्या कॅमेऱ्यासमोर म्हणाला. त्याच्या या वक्तव्याने सर्वत्र चागंलीच खळबळ उडाली आहे.
ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे आव्हान होते. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ललित पाटीलला शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली होती. पण त्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळत नव्हती. मात्र, ललित पाटीलला एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला. ललित पाटीलला बंगळुरूमधून पळून जाताना अटक झाली. ललित पाटीलसह त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलीस दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.