Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते ‘ही’ मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी…

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने संपूर्ण तपास परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. १८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2026 | 01:18 PM
Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते 'ही' मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी...

Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते 'ही' मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी...

Follow Us
Follow Us:

पुणे : केतन अग्रवाल हत्येप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. या तपासात पुणे पोलिसांसमोर ठोस पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, न्यायालयात खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडून अत्यंत काळजीपूर्वक आरोपपत्र तयार केले जात आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने संपूर्ण तपास परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. १८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेला कोणीही प्रत्यक्ष पाहिले नसल्याने प्रत्येक पुरावा कायदेशीरदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. मेघालयातील चर्चित सोनम रघुवंशी हत्याप्रकरणात अटक प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे आरोपीला न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याची बाब लक्षात घेऊन पुणे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. अशा प्रकारच्या कायदेशीर त्रुटी टाळण्यासाठी सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, केतनचा मोबाईल काही काळ सिया गोयलकडे होता. नंतर तो अग्रवाल कुटुंबीयांकडे परत देण्यात आला. या मोबाईलमधील माहितीचा तपासात महत्त्वाचा वापर होण्याची शक्यता आहे. बुधवारी पोलिसांनी सहआरोपी चेतन चौधरीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना (रिकन्स्ट्रक्शन) केली. या कारवाईत हत्येचा कट आणि घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.

राजस्थान कनेक्शनही चर्चेत

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे नियोजनबद्ध कट असल्याचा पोलिसांचा संशय असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबतही नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, चेतनच्या जोधपूरमधील मित्रांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणातील राजस्थान कनेक्शन चर्चेत आले आहे.

Ketan Agrawal Muder Case : दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Web Title: Investigation faces a challenge due to the absence of eyewitnesses in ketan agrawal case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Ketan Agrawal Murder Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.