Madhya Pradesh : गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू
आधीच चॅट्स डिलीट केले ?
१८ जूनला लोहगडावरून ढकलून देत लोहगडावरून ढकलण्यात आले. केतनचे कुटुंबीय तिथे पोहोचण्यापूर्वी काही काळ केतनचा फोन सियाकडेच होता.नंतर तिने तो फोन केतनच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. परंतु हा फोन हाती लागल्यांनंतर सियाने त्यातील चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स किंवा इतर काही डेटा डिलीट केला होता का, याची पडताळणी पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हत्येचा कट उघड होऊ नये म्हणून सिया आणि चेतन या दोघांनीही आपापसातील अनेक चॅट्स आधीच डिलीट केले होते.
चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन…
चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध इतके घट्ट होते की, ते एकमेकांसोबत उदयपूर आणि जोधपूर येथे फिरायलाही गेले होते. जोधपूरमध्ये चेतनच्या मित्रांनी त्या दोघांना एकत्र पाहिले देखील होते. चेतनने आपल्या मित्रांना विश्वासाने सांगितले होते की, “आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार आहोत.” इतकेच नव्हे तर, चेतन अनेकदा सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानच्या संस्कृतीशी संबंधित रील्स दाखवायचा. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूरमध्ये कायमचे सेटल होण्याचा या दोन्ही आरोपींचा विचार होता. “लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होण्यासाठी लागणाऱ्या रकमेची सोय सिया स्वतःच्या घरातून (कुटुंबाकडून) करेल,” असा दावा चेतनने आपल्या मित्रांजवळ केला होता.
Ans: केतनला दरीत ढकलण्यापूर्वी त्याचा मोबाईल सिया गोयलकडे होता आणि त्यातील डेटा डिलीट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Ans: फोनमधील डिलीट केलेले चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक तपास केला जात आहे.
Ans: दोघेही लग्नानंतर राजस्थानमध्ये, विशेषतः जोधपूर किंवा उदयपूर येथे स्थायिक होण्याचा विचार करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.






