Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • अन्य
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    • धर्म
    • व्हायरल
    • व्हिडिओ
    • वेब स्टोरीज़
    • फोटो
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: थोड्या तरी लाजा बाळगा रे…! जळगावात २८ महिन्यात ४६ मुली आणि ४ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

अज्ञात आरोपींची संख्या शून्य असल्याने, अल्पवयीनांवरील अत्याचारांमध्ये परिचित व्यक्तींचा मोठा सहभाग असल्याचे अधोरेखित झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2026 | 03:45 PM
Jalgaon News, Child Abuse, POCSO Act, Maharashtra Crime

Jalgaon News, Child Abuse, POCSO Act, Maharashtra Crime

Follow Us
Close
Follow Us:
  • २८ महिन्यांत ५० बालकांचे (४६ मुली आणि ४ मुले) लैंगिक शोषण
  • धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हे बाहेरचे नसून कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा शेजारी
  • २५ आरोपी हे पीडितांच्या ओळखीतील
Jalgaon Child Abuse Cases 2026: पुण्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्येची घटना ताजी असतानाच जळगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या २८ महिन्यात ४६ मुली आणि ४ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहे. या प्रकरणांमधील धक्कादायक बाब म्हणजे या बालकांवर अत्याचार करणारे दुसरे तिसरे कोणीही नसून कुटुंबातील आणि परिचित लोकांनी हे गु्न्हे केल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. (Crime News) 

जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक आकडेवारीने महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसत आहे. आरोपी अल्पवयीन मुलांना टार्गेट करून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. काही प्रकरणांमध्ये अत्याचार करून त्यांची हत्याही केली जात आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानुसार की, जळगाव जिल्ह्यात गेल्या २८ महिन्यांत बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनीच हे गुन्हे केल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे.

Child Abuse Awareness: बाललैंगिक अत्याचार, ‘पेडोफिलिक डिसऑर्डर …

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांबाबत समोर आलेल्या आकडेवारीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडितांच्या परिचयातीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, अनेक घटना शेजारील घरांमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

पीडितांच्या वयोगटातील धक्कादायक वास्तव

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये अतिशय कमी वयाच्या मुलांचाही समावेश आहे.

७ वर्षांखालील पीडितांची संख्या ११ इतकी आहे.

१४ वर्षांखालील पीडितांची संख्या १६ आहे.

१७ वर्षांखालील पीडितांची संख्या २३ इतकी नोंदवली गेली आहे.

यातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, सर्वात कमी वयाच्या पीडितेचे वय अवघे ३ वर्षे असल्याची नोंद आहे.

 

आरोपींच्या वयोगटात तरुणांचे प्रमाण अधिक

या प्रकरणांतील संशयित आरोपींच्या वयोगटाकडे पाहिल्यास २१ ते ३० वर्षे वयोगटातील आरोपींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते.

१४ वर्षे वयाचे २ संशयित आरोपी आहेत.

१७ ते १९ वयोगटातील १२ संशयित आहेत.

२१ ते ३० वयोगटातील तब्बल २२ संशयित आरोपी आहेत.

३० ते ५० वयोगटातील ८ आरोपींची नोंद आहे.

६० वर्षांवरील ६ संशयित आरोपींचाही समावेश आहे.

या प्रकरणांतील सर्वांत वयस्कर आरोपीचे वय ७८ वर्षे असल्याचे समोर आले आहे.

Child Abuse Awareness part 2: घरातील हिंसा ठरतेय विकृतीचे मूळ; मुलांमधील ‘असंवेदनशीलता’ भविष्यासाठी धोक्याची घंटा

 

आरोपी बहुतांश परिचयातीलच

या आकडेवारीतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, एकाही प्रकरणात आरोपी अज्ञात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

२५ आरोपी हे पीडितांच्या ओळखीतील होते.

१० आरोपी हे नातेवाईक होते.

१२ आरोपी शेजारी होते.

१ आरोपी मित्र होता.

२ आरोपी हे शाळेशी संबंधित व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.

अज्ञात आरोपींची संख्या शून्य असल्याने, अल्पवयीनांवरील अत्याचारांमध्ये परिचित व्यक्तींचा मोठा सहभाग असल्याचे अधोरेखित झाले आहे.

 

बहुतांश घटना शेजारील घरांमध्ये

घटनास्थळाच्या माहितीतूनही गंभीर वास्तव समोर आले आहे.

सर्वाधिक २८ घटना शेजारच्या घरांमध्ये घडल्या.

११ घटना शेतामध्ये घडल्याची नोंद आहे.

९ घटना खुल्या जागेत घडल्या.

प्रत्येकी १ घटना कार आणि व्हॅनमध्ये घडली आहे.

 

आरोपींची सध्याची स्थिती

या प्रकरणांतील २२ संशयित आरोपी सध्या तुरुंगात आहेत. एका आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरित आरोपी सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Web Title: Jalgaon child abuse cases 2026 minor sexual assault statistics jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 03:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.