Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक खोलीत गेले अन्…

बाप्पाच्या आगमनासाठी घरात पूजेची तयारी सुरू होती. मात्र, पूजा सुरू होण्याची वेळ झाली तरी माय-लेक खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला अन् धक्कादायक घटना समोर आली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 15, 2026 | 09:06 AM
Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक खोलीत गेले अन्...

Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक खोलीत गेले अन्...

Follow Us
Follow Us:
  • जळगाव परिसरातील आई आणि चार वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू
  • गणपती स्थापनेच्या तयारी दरम्यान आई मुलाला घेऊन खोलीत गेली
  • बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय
जळगाव: गणेशोत्सवाच्या उत्साहात घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच जळगाव शहरातील दशरथनगर परिसरात मन सुन्न करणारी घटना घडली. तळेले कॉलनीत एका विवाहितेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह जीवन संपविल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हेमांगी निखिल महाजन आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा शौर्य महाजन अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. हेमांगी यांचे पती निखिल महाजन हे सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवेत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Crime News: मोबाइलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य

पूजेच्या तयारीदरम्यान घडली घटना

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी घरात तसेच गल्लीतील गणेश मंडळाच्या बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू होती. कुटुंबीय पूजेच्या तयारीत व्यस्त असतानाच हेमांगी या मुलाला घेऊन एका खोलीत गेल्या. काही वेळाने पूजा सुरू होण्याची वेळ झाली, तरी त्या बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा ठोठावून त्यांना आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शनिपेठ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खोलीत माय-लेक गंभीर अवस्थेत आढळले.

हेही वाचा: Police Molestation Case: ‘चल येते का…’ म्हणत महिलेची छेड; कर्जतमध्ये पोलिस कर्मचाऱ्याविरोधात संताप नेमका प्रकार काय?

रुग्णालयात नेले, मात्र जीव वाचला नाही

पोलिसांनी दोघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माय-लेकाने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime preparations for the ganpati arrival puja were underway a mother and daughter went into the room and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:06 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.