
Bajrang Dal, RSS, Uttarakhand News, PDP Leader Iltija Mufti,
बुधवारी उत्तराखंडच्या उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर भागात एक लज्जास्पद घटना घडली. वृत्तानुसार, काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी बिलाल अहमद, गेल्या १० वर्षांपासून प्रतापपूर परिसरात शाल विकतात, यावेळी अहमद यांच्यावर जमावाने हल्ला केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बिलाल अहमद यांना घेरले आणि त्यांना “भारत माता की जय” म्हणण्यास दबाव टाकला. पण बिलाल यांनी नकार दिल्यास त्यांच्यावर जमावाने क्रूरपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला जबर मारहाण केली. इतकेच नव्हे तर, ताबडतोब राज्य सोडण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. “बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका काश्मिरी व्यक्तीला केवळ विशिष्ट घोषणा देण्यास नकार दिल्याने मारहाण केली. “बजरंग दल आणि आरएसएस हे देशासाठी प्राणघातक कर्करोगासारखे आहेत, जे भारताला सातत्याने आजारी पाडत आहेत.” अशा शब्दांत ट्विट करत त्यांनी RSS आणि बजरंग दलावर निशाणा साधला आहे. तसेच, आज महात्मा गांधींचा समावेशी भारत आता “मृत्यूच्या उंबरठ्यावर” आहे.” अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Politics: पैसा है कैसा…नही कोई ऐसा! धनाढ्यांकडून निवडणूक हायजॅक;
धक्कादायक बाब म्हणजे, पीडित बिलाल अहमद यांचे सामानही लुटण्यात आले, ज्यामुळे स्थानिक व्यापारी समुदायात भीती निर्माण झाली. जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेने (जेकेएसए) या प्रकरणात सक्रिय कारवाई केली आहे. उत्तराखंडचे पोलिस महासंचालक (डीजीपी) दीपम सेठ यांना औपचारिक पत्र लिहित त्यांनी याकडे लक्ष वेधले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बिलाल या भागात नवीन नव्हता, गेल्या १० वर्षांपासून तो शांततेत आपला व्यवसाय करत होता. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा आणि गुन्हेगारांवर शक्य तितकी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जेकेएसएन’कडून करण्यात आली आहे.