जयपूरमध्ये मशिदीबाहेर जोरदार राडा (फोटो- सोशल मीडिया)
भल्या पहाटे जयपूरमध्ये मशिदीबाहेर राडा
पोलिस आणि 24 तासांसाठी इंटरनेटवर घातली बंदी
जयपूरच्या चौमुन या परिसरात झाली दगडफेक
जयपूर: जयपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जयपूरमध्ये ग्रामीण भागात असलेल्या चौमून परिसरात एका मशिदीबाहेर हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. मशिदीबाहेरील दगड हटविण्यावरून हा वाद उफाळून आला आहे. पोलिसांनी ते रोखण्याच प्रयत्न केला असता, विशिष्ठ समुदायाच्या सदस्यांनी दगडफेक केली आणि त्यात बरेच पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान जयपूरमध्ये एका मशिदीबाहेर हिंसाचार उफाळून आला आहे. काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये बरेच पोलिस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही घटना पहाटेच्या वेळेस घडली. त्यानंतर या परिसरात 2 तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
#WATCH | Jaipur, Rajasthan: Police detained some people following the incident of stone pelting in Chomu. Heavy security deployed. https://t.co/oo30MVUGcc pic.twitter.com/J7IGcKr96M — ANI (@ANI) December 26, 2025
नेमके प्रकरण काय?
चौमून परिसरात एका मशिदीबाहेर काही दगड लावण्यात आलेले आहेत. प्रशासनाशी झालेल्या चर्चेत ही दगड हटवण्यावर सहमती झाली. मात्र रात्री उशिरा काही लोकांनी रेलिनग बसून मशिदीबाहेर सीमा भिंतीचे काम सुरू केले. पोलिस हस्तक्षेप करण्यासाठी आले असतं तेथे निदर्शने सुरू केली गेली. पोलिसआणि कारवाई केल्यावर निदर्शन करणाऱ्या लोकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या.
त्यानंतर या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी कारवाई केल्यावर काही काळाने तेथील परिस्थिती निवळली. दरम्यान या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच 24 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मशिडीबाहेरील दगड हटविण्याचे काम शांततेत केले जाणार होते.
Bajrang Dal And RSS: बजरंग दल आणि RSS हे देशासाठी प्राणघातक कर्करोग; बड्या नेत्याची जहरी टिका
मात्र रात्रीच्या सुमारास तेथे काही लोकांनी रेलिंग बसवण्यास सुरुवात केली. तेव्हा काही लोकांनी त्याचा विरोध करण्यास सुरुवात केली. विरोध एवढा वाढला की त्या विरोधाचे रूपांतर हिंसाचारात झाले. सध्या या परिसराला पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. या भागाला छावणीचे स्वरूप आले आहे.
त्यानंतर त्या ठिकाणी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी या ठिकाणी हा हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलिस जखमी झाले. त्यानंतर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्ज केल्यावर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतले आहे. या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण दिसून येत आहे.






