Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kidnapping News: ‘मुलं पळवणारी टोळी’ आली म्हणताच पालकांची धावपळ; ४० सीसीटीव्हींनी उलगडले रहस्य!…

दहीहंडीच्या गर्दीत दीड वर्षांचा चिमुकला अचानक एका अनोळखी महिलेच्या सोबत जात असल्याचे दिसताच परिसरात खळबळ उडाली. ‘मुलं पळवणारी टोळी’ आल्याच्या चर्चेने भीती आणखी वाढली; मात्र ४० हून अधिक सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांनी वेगळेच सत्य समोर आणले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 06, 2026 | 03:50 PM
Kidnapping News: ‘मुलं पळवणारी टोळी’ आली म्हणताच पालकांची धावपळ; ४० सीसीटीव्हींनी उलगडले रहस्य!...

Kidnapping News: ‘मुलं पळवणारी टोळी’ आली म्हणताच पालकांची धावपळ; ४० सीसीटीव्हींनी उलगडले रहस्य!...

Follow Us
Follow Us:
  • दहीहंडीच्या गर्दीत चिमुकल्याला नेण्याचा केला प्रयत्न
  • ४० हून अधिक सीसीटीव्ही तपासताच उलगडले सत्य
  • मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा
ओतूर;प्रतिनिधी मनोहर हिंगणे: नेतवड (ता. जुन्नर) येथे दहीहंडीच्या कार्यक्रमातील गर्दीत दीड वर्षांच्या चिमुकल्याला अनोळखी महिलेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्यानंतर ‘मुलं पळवणारी टोळी आली आहे’ अशी अफवा समाजमाध्यमांवर वेगाने पसरल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ओतूर पोलिसांनी तातडीने तपास करत ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून संबंधित महिलेचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असून, परिसरात टोळी सक्रिय असल्याचे तपासात आढळले नाही.

दहीहंडीच्या गर्दीत प्रकार

नेतवड येथे सकाळी सुमारे ११ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असताना दीड वर्षांचा मुलगा खेळत होता. त्यावेळी एक अनोळखी महिला मुलाजवळ आली. ती मुलाला घेऊन जात असल्याचे आजीच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ मुलाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित महिला लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून जुन्नरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा: UP Crime News: जन्माष्टमीच्या गर्दीत मुलीचे अपहरण; कुटुंबीय हादरले, तपासात गंभीर प्रकार उघड

पोलिसांची तातडीने दोन पथके

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दोन पथके तयार केली. पोलिसांनी ओतूर, जुन्नर तसेच परिसरातील मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

महिलेची ओळख पटली

पोलिसांनी ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून लाल रंगाच्या स्विफ्ट कारचा माग काढला. अखेर हे वाहन जुन्नर येथे आढळून आले. त्यानंतर वाहनातून गेलेल्या महिलेची ओळख पटवण्यात आली. सदर महिला आरीफा मुराद व्यापारी (वय ५२, रा. जुन्नर) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. तसेच ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

टोळी असल्याचे पुरावे नाहीत

तपासात संबंधित महिला सकाळी नेतवड येथे आली होती. तेथे नातेवाईकांची भेट झाल्यानंतर त्यांनी तिला लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून जुन्नर येथे परत नेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, घटनेनंतर सोशल मीडियावर ‘मुलं पळवणारी टोळी’ असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात अशा कोणत्याही टोळीचे अस्तित्व आढळून आलेले नाही.

Mumbai Crime News: ‘स्पेशल २६’ पाहून रचला कट; बनावट रेड टाकून व्यापाऱ्याचे अपहरण, १ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांवर सातत्याने लक्ष ठेवावे, त्यांना घरात, वाहनात किंवा सार्वजनिक ठिकाणी एकटे सोडू नये, तसेच घर, दुकान आणि परिसराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी केले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदिप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, पोलीस कर्मचारी ज्योतीराम पवार, अमोल शिंदे, राजेंद्र आमले, आशिष जगताप आणि महिला पोलीस कर्मचारी आकांक्षा साबळे सहभागी होते.

Web Title: Kidnapping news panic among parents at the mere mention of a child lifting gang mystery solved by 40 cctv cameras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.