सौजन्य फोटो - सोशल मिडीया
‘स्पेशल २६’ची नक्कल
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आधी व्यापाऱ्याच्या कार्यालयात प्रवेश केला. तेथे त्यांचे काही साथीदार आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी स्वतःची ओळख आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी अशी करून दिली. त्यानंतर व्यापारी, त्यांच्या पत्नी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले.
YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
तीन तास ‘रेड’चे नाटक
आरोपींनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करत कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी एका आरोपीने बनावट ‘सर्च वॉरंट’ दाखवून व्यापाऱ्याची सही घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर मोठा दंड होण्याची भीती दाखवत प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. सुमारे तीन तासांहून अधिक काळ हे बनावट रेडचे नाटक सुरू होते. रात्री आठच्या सुमारास आरोपी तेथून निघून गेले.
पोलिसांनी शोधला क्लू
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कॉल डिटेल्स, मोबाईल डेटा, लोकेशन तसेच परिसरातील सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासातून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
मुंबई-पुण्यातून सहा जण अटकेत
तपासाअंती पोलिसांनी संतोष खोपकर (३७) आणि विनय मोरे (३७) यांना मुंबई उपनगरातून अटक केली. फोन बंद करून पसार झालेल्या प्रेम सबनानी (५०) याला पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. प्रज्ञा एच. एम. (२७) हिला अंधेरी पूर्व आणि रेश्मा श्यामराव वारंग (४१) हिला नालासोपारा येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात शबीना शेख (४८), जितेंद्र मोरे आणि अशोक शिंदे (५७) यांचीही नावे समोर आली आहेत. यातील जितेंद्र मोरे आणि अशोक शिंदे हे मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका गुन्ह्यात यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुख्य सूत्रधाराचा शोध
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनची तपासणी सुरू केली आहे. व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड तसेच आर्थिक व्यवहार तपासले जात असून या कटामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.






