कोलकात्यातील आरजी कार अत्याचार आणि हत्या प्रकरणी सियालदह न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
Kolkata doctor case News In Marathi: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला सोमवारी १६४ दिवसांनंतर सियालदाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने म्हटले, ‘हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही.’ त्यामुळे मृत्युदंड देता येत नाही.
न्यायालयाने याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. दुपारी १२:३० वाजता न्यायालयाने दोषी संजय, सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबाच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधीश अनिर्बान दास यांनी संजयला सांगितले की, तुम्ही कोणत्या गुन्ह्यांसाठी दोषी आहात हे सांगितले आहे. न्यायालयाने संजयला बोलण्याची संधी दिली होती.
यापूर्वी, १८ जानेवारी रोजी न्यायालयाने संजयला दोषी ठरवले होते, परंतु शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. संजयच्या शिक्षेसाठी १६० पानांचा निकाल लिहिण्यात आला आहे. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज-रुग्णालयात ८-९ ऑगस्टच्या रात्री एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. संजय रॉय यांना १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
संजय रॉयला भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (लैंगिक अत्याचार), ६६ (बलात्कारामुळे मृत्यू) आणि १०३-१ (खून) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. कलम १०३(१) अंतर्गत मृत्युदंड किंवा जन्मठेप, कलम ६६ अंतर्गत किमान २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि कलम ६४ अंतर्गत किमान १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. हे मृत्युपर्यंत जन्मठेपेत रूपांतरित केले जाऊ शकते.
न्यायाधीशांनी विचारले, संभाव्य शिक्षेबद्दल तुम्हाला काही सांगायचे आहे का? न्यायाधीशांनी संजय रॉय यांना सांगितले की अताचाराच्या कलमाखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. खून करण्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते आणि कलम १०३ साठी तुम्हाला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.
सीबीआयच्या वकिलाने पुन्हा एकदा मृत्युदंडाची मागणी केली. या घटनेने संपूर्ण देश हादरला असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. शिक्षेमुळे समाजात विश्वास निर्माण होईल. गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे. समाजाचा विश्वास पुनर्संचयित करावा लागेल. पालकांनी त्यांची मुलगी गमावली. विद्यार्थी समाजासाठी खूप महत्त्वाचा होता.
संजय रॉय यांना सोमवारी कडक सुरक्षेत शिक्षा सुनावण्यासाठी न्यायालयात आणण्यात आले. सकाळी १०.१५ वाजता रॉय यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना न्यायालयात आणताना अनेक पोलिस वाहने उपस्थित होती. सियालदाह न्यायालयात सुमारे ५०० पोलिस तैनात करण्यात आले होते आणि अधिकाऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात असूनही, अनेक लोक न्यायालयाच्या आवारात गर्दी करत होते आणि काही जण दोषीला पाहण्यासाठी रेलिंगवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसले.