Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Siddique Case: लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केलीच नाही? बाबा सिद्धिकी प्रकरणात मोठा ट्विस्ट

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात नसावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 23, 2024 | 03:53 PM
Baba Siddique Case: लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केलीच नाही? बाबा सिद्धिकी प्रकरणात मोठा ट्विस्ट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांची गेल्या आठवड्यात त्यांच्या कार्यालासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याच्या बातम्याही सुरूवातीला प्रसिद्ध झाल्या. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर सुरूवातीला शुभम लोणकरने  बिष्णोईच्या नावावर या हत्येची जबाबदारीही घेतली. त्यानंतर या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले. पण या प्रकरणातील तपासात आता नवा ट्विस्ट आला आहे.

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात नसावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीने या हत्येबाबत कोणताही जबाब दिलेला नाही. याचे कारण म्हणजे आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून ज्याज्या हत्या करण्यात आल्या, त्यावेळी गँगच्य महत्त्वाच्या माणसाने पुढे येऊन त्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पण बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर त्याच्या गँगच्या कोणत्याही महत्त्वाच्या माणसाने या हत्येबाबत कोणतेही विधान केलेले नाही. त्यामुळेच या प्रकरणात बिश्नोई गँगच्या सहभागावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा:  Maharashtra Assembly Election : दोन ठाकरे आणि शिंदे? माहिमध्ये होणार हायहोल्टेज लढत, अमित ठाकरेंविरोधात मोठी

लॉरेन्सचा सहकारी रोहित गोदारा, त्याच्या भाऊ भाऊ अनमोल किंवा आता कॅनडात स्थायिक झालेला गोल्डी ब्रार, यांपैकी कोणीही बाबा सिद्धिकी यांच्या हत्येबाबत अद्यापही मौन बाळगले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होत आहे.   विशेष म्हणजे, एप्रिल 2024 मध्ये ज्यावेळी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी लॉरेन्सच्या गँगने पुढे येऊन त्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचबरोबर शुभम लोणकरची पार्श्वभूमी ही देखील  पोलिसांच्या या संशयाला अधिक बळकटी देते. याचे कारण म्हणजे. शुभम लोणकरची पार्श्वभूमी. शुभम लोणकर हा पुण्याचा आहे. तो मराठी शाळेतून शिकलेला असल्यामुळे त्याचे हिंदी आणि मराठी भाषेवरील प्रभुत्वही कमीच आहे.

हेही वाचा:  जितेंद्र आव्हाड विरोधात अजित पवार गटाची बड्या नेत्याला संधी: एकेकाळचे सहकारी आता देणार

इतकेच नव्ह तर सोशल मीडीयापोस्टवरूनही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शुभम लोणकरची सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यास त्याने पोस्टमध्ये लिहीलेला मजकूर हा त्याचा नसून अन्य कोणतरी त्याला लिहून पाठवला असावा, असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबरला मुंबईतील वांद्रे येथील बाबा सिध्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. आतापर्यंत या प्रकरमात 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Lawrence bishnoi gang did not kill baba siddiqui police investigation reveals nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबईत दांडियाचा जल्लोष राड्यात बदलला; 19 वर्षीय मुलाचं नाक फोडलं, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
1

Mumbai Crime: मुंबईत दांडियाचा जल्लोष राड्यात बदलला; 19 वर्षीय मुलाचं नाक फोडलं, खासदार रवींद्र वायकर आक्रमक

Mumbai News: विक्रोळीतील धक्कादायक प्रकरण, मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत; काय नेमकं प्रकरण?
2

Mumbai News: विक्रोळीतील धक्कादायक प्रकरण, मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत; काय नेमकं प्रकरण?

Mumbai crime: मुंबईत डबल मर्डर! 23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या, नंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले
3

Mumbai crime: मुंबईत डबल मर्डर! 23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या, नंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले

Mumbai Crime: कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून; मुलगाच ठरला कटात सहभागी
4

Mumbai Crime: कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून; मुलगाच ठरला कटात सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.