Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; भावासह पुतण्याही गंभीर जखमी

नायगाव-खंडेवाडी परिसरात सावे कुटुंबीयांची जमीन तसेच काँक्रीट प्लांट आहे. या भागातून जाणाऱ्या शेतरस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 07:50 AM
धक्कादायक ! राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; भावासह पुतण्याही गंभीर जखमी

धक्कादायक ! राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; भावासह पुतण्याही गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे शेती आणि रस्त्याच्या वापरावरून झालेल्या वादातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे बंधू आणि पुतण्यावर अंदाजे १५ ते २० जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अमेय अजित सावे (वय ३५) यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, त्यांना शहरातील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

तसेच अतुल सावे यांचे सख्खे बंधू अजित मोरेश्वर सावे (वय ७०) यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. अजित सावे यांच्या डोक्यालाही इजा झाली असून, त्यांना आठ टाके पडले आहेत. गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नायगाव-खंडेवाडी परिसरात सावे कुटुंबीयांची जमीन तसेच काँक्रीट प्लांट आहे. या भागातून जाणाऱ्या शेतरस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्याची रुंदी, हद्द आणि त्याच्या वापरावरून सावे कुटुंबीय आणि परिसरातील काही शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, गुरुवारी रस्त्याचे काम सुरू असताना हद्दीच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला. त्यावेळी अजित सावे आणि अमेय हे कामगारांसह परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी मोठा जमाव तेथे आला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. जमावातील काही जणांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.

ICU मध्ये उपचार सुरु

सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अजित सावे यांच्या डोक्यालाही मार लागला असून, त्यांना आठ टाके पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी केली. त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मारहाणीमागील नेमके कारण तसेच घटनेची पार्श्वभूमी याचा तपास पोलिस करत असून, रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मारहाणीचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती

अजित सावे आणि त्यांचा मुलगा अमेय यांना जबर मारहाण करण्यात आल्याचे काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या व्हिडिओच्या आधारेही तपास करण्यात येत असल्याची माहिती बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक निलेश शेळके यांनी दिली.

हल्ल्यामागे अन्य कारणाची चर्चा

सावे कुटुंबीयांचा काँक्रीट प्लांट गेल्या सुमारे दोन वर्षांपासून सुरू असून, या काळात परिसरात मोठा वाद झाल्याची माहिती समोर आलेली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांनंतर अचानक एवढ्या मोठ्या संख्येने जमाव शस्त्रांसह एकत्र येण्यामागे केवळ शेतरस्त्याचा वादच कारणीभूत आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

Web Title: Life threatening attack on atul saves brother ajit save

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 07:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.