श्रध्दा वालाकर प्रकरणी सर्व देश हळहळ व्यक्ती होत असताना बिहारमधील एक घटना समोर आली आहे. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही नराधमांनी 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे गुप्तांग, स्तन आणि जीभ कापून टाकली. त्यानंतर ही मुलीचा मृत्यू झाला असे समजून, तिला तसेच एका बागेत फेकून ते पळून गेले.
नातेवाईकांनी सांगितले की 11 नोव्हेंबर 2022 रोजी काही लोकांनी मुलीला घरातून उचलले आणि सोबत नेले. यानंतर सर्वांनी तिच्यावर बलात्कार करून मुलीला बेशुद्धावस्थेत घराजवळील बागेत सोडले. बरीच शोधाशोध केल्यावर मुलगी बागेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. स्थानिक ग्रामस्थ देणगी जमा करून मुलीवर उपचार करत आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
समस्तीपूरचे एसपी हृदय कांत म्हणाले, ’13 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. चकमेहसी पोलिसांना मुजफ्फरपूरला जबाब घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.’ मुलीवर अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या नराधमांबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या कृत्याला जबाबदार असलेल्या नराधमांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे केली आहे.