Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या, घरी परतत असताना हल्ला

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील शांतीनिकेतन पोलीस स्टेशन परिसरात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.नेमकं काय प्रकरण?

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2024 | 09:29 AM
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या, घरी परतत असताना हल्ला (फोटो सौजन्य-X)

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या, घरी परतत असताना हल्ला (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. बोलपूर उत्तरनारायणपूर गावात तृणमूल काँग्रेसचे नेते रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. बीरभूम जिल्ह्यातील शांतीनिकेतन पोलीस स्टेशन हद्दीतील कंकालितला ग्रामपंचायतीच्या उत्तरनारायणपूर गावात शनिवारी (2 नोव्हेंबर) रात्री उशिरा तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी त्यांना रक्तस्त्राव अवस्थेत बर्दवान मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपाचारादरम्यान त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले.

समीर थंडर (४५) असे मृत तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक सदस्याचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी पाच आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, समीर थंडर हे शनिवारी रात्री उशिरा उत्तरनारायणपूर गावात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.त्यांना प्रथम बोलपूर विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला बर्दवान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा:  दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा प्रवाशांना मनस्ताप; एसटी स्थानकांमध्ये तब्बल लाखोंचा माल गेला चोरीला

समीर थंडर हे पारुलडांगा पंचायतीचे सदस्य होते. समीर यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत समीर थंडर यांच्या दोन्ही पत्नी रीटा थंडर आणि मामनी थंडर म्हणाल्या, रात्री आम्हाला फोनवर बातमी मिळाली की काहीतरी गडबड आहे. त्यानंतर समीर यांना बेदम मारहाण केल्याचे ऐकले. याआधीही हाणामारी झाली होती. हत्येचे कारण समजू शकलेले नाही. उत्तरनारायणपूरच्या लोकांनीच त्यांची हत्या केली. दोषींना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. दरम्यान, तृणमूलचे बोलपूर ब्लॉक अध्यक्ष मिहिर राय म्हणाले: हत्येचे कारण समजू शकलेले नाही. पण हा पक्षाचा मुद्दा नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कंकलीतला ग्रामपंचायतीचे उपप्रमुख मोहम्मद ओहिउद्दीन उर्फ ​​ममन म्हणाले: याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.

समीर थंडर यांचा मुलगा प्रतीक थंडर म्हणाला, ‘गावातील काही लोकांनी माझ्या वडिलांवर हल्ला केला. तर सुरी विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार विकास रॉय चौधरी यांनी सांगितले की, गावातील काही वादातून थंडर यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

५ जण पोलीस कोठडीत

या घटनेप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांवर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मिंखा येथील तुनमुलच्या आमदार उषा राणी मंडल यांना गुरुवारी रात्री कालीपूजा मंडपातून परतत असताना हरोआ परिसरात 100 ते 150 लोकांनी घेराव घातला. आपल्याला वाहनातून फेकून मारण्यात आल्याचे मंडल यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेदरम्यान अनेक गोळ्याही झाडण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा:  पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क

Web Title: Local trinamool congress leader shot dead in west bengal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 09:29 AM

Topics:  

  • Mamata Banerjee

संबंधित बातम्या

OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी
1

OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.