
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
बुधवारी सकाळी डायल-११२ वर एका वृद्ध महिलेला अज्ञात व्यक्तीने गंभीर जखमी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घाटाखेड़ी गावातील एका शेताजवळील झोपडीत पोहोचले. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाच्या मदतीने तपास करून महत्वाचे पुरावे गोळा केले.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गावातील शेताजवळ काही जणांची जेवणाची पार्टी सुरु होती. त्या वेळी महिलेचा मुलगा तिला शेतातील झोपडीत एकटीलाच सोडून पार्टीला गेला होता. दरम्यान, पार्टीत उपस्थित असलेला रामनिवास भील हा काही वेळाने कोणालाही न सांगता तेथून निघून गेला. पार्टीच्या दुसर्या दिवशी सकाळी महिलेला शोधतांना ती जवळच्या गव्हाच्या शेतात गंभीर जखमी अवस्थेत पडलेली आढळली. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होते तसेच जबड्यावर गंभीर जखमा होत्या.
Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला
पोलिसांनी गावकऱ्यांची चौकशी केली असता आरोपी त्या रात्री रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परातल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने कपडे बदलून गावातून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन, रक्ताने माखलेले कपडे आणि इतर पुरावे जप्त केले. त्यांनतर पोलिसांनी आरोपी रामनिवास रायसिंह भील याला अटक केली. आरोपी हा मृत महिलेचा सख्खा नातू नसून दूरच्या नात्यातील नातू असल्याचे स्पष्ट आहे.
चौकशीत धक्कादायक कबुली
पोलिसांनी आरोपी रामनिवास रायसिंह भील याला अटक केली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, तो बराच काळ त्या वृद्ध महिलेवर वाईट नजरेने लक्ष ठेवून होता. ३ मार्च रोजी त्याने नियोजनपूर्वक कोंबडी खरेदी केली आणि कोंबडी पार्टीचे कारण सांगून त्या वृद्धेच्या मुलाला पार्टीसाठी बोलावून घेतले. पार्टी सुरू असताना आरोपी हळूच तेथून निघून शेतातील झोपडीकडे गेला, जिथे ती वृद्ध महिला एकटी होती. त्याने तिला आवाज देऊन बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने जवळच्या गव्हाच्या शेतात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वृद्ध महिलेनं विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिच्या नाकावर आणि तोंडावर दातांनी चावा घेत गंभीर जखमी केले. या जखमांमुळे ती गंभीर अवस्थेत गेली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.
Ans: राजगड जिल्ह्यातील घाटाखेड़ी गावात ही घटना घडली.
Ans: रामनिवास रायसिंह भील हा आरोपी असून तो मृत महिलेचा दूरच्या नात्यातील नातू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Ans: घटनास्थळी मिळालेल्या पुरावे, कपडे आणि गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला 24 तासांत अटक केली.