सिंधुदुर्ग: राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळ्या प्रकरणी स्ट्रक्चरल डिझायनर केतन पाटील यांला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. केतन पाटील याने पुतळ्याच्या चौथऱ्याचे डिझाईन केले होते. पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
पुतळा कोसळल्यानंतर चेतन पाटील याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आपण फक्त पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले होते. पण संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही. महाराजांच्या पुतळ्याचं जे काम झाले ते ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते, असेही त्याने स्पष्ट केलं. तसेच, पुतळ्यासाठी जो चौथरा उभारण्यात आला होता, त्याच डिझाईन नौदलाला तयार करून देण्यात आले होते. यानंतर त्यासाठी नौदलाकडून आपल्याला कोणतीही वर्क ऑर्डर मिळाली नसल्याचेही चेतनने सांगितले होते.
हेदेखील वाचा: ‘लाडकी बहीण’ योजनेची वारंवार आठवण करून द्या; खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
हेदेखील वाचा: घरामध्ये सरड्याचे अंडे दिसणे शुभ की अशुभ? कशाचे लक्षण आहे, जाणून घ्या