गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर (Shradhha Walkar) हत्याकांडाने सगळ्या देशात हादरवुन सोडलं होतं. हे प्रकरण अद्याप निवळलं नसुन अशा घटना अद्यापही घडत असल्याचं दिसत आहे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या गुरुग्राममध्येही श्रद्धा हत्याकांड सारखे भयानक प्रकरण समोर आले आहे. पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या पतीला गुरुग्राम पोलिसांनी मानेसर येथून अटक केली आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शुक्रवारी पोलीस आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत.
[read_also content=”मेट्रोमध्ये खुलेआम Oral Sex करताना कपलचा व्हिडिओ व्हायरल! हे सगळं करायला येता का मेट्रोमध्ये,नेटकरी भडकले https://www.navarashtra.com/viral/a-video-of-a-couple-doing-oral-sex-openly-in-the-metro-goes-viral-netizens-were-furious-nrps-392554.html”]
काही दिवसांपूर्वी हरियाणातील गुरुग्राममधील मानेसरच्या कुकडोला गावात 21 एप्रिल रोजी शेतात बांधलेल्या खोलीत महिलेचे अर्धे जळालेले धड सापडल्याने खळबळ उडाली होती. महिलेच्या धडापासून दोन्ही हात, दोन्ही पाय आणि मानेचा वरचा भाग गायब होता. या महिलेची हत्या अन्यत्र झाल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा पतीला अटक केली आहे. खून आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून विकृत अवस्थेत आढळून होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणातील आरोपी 34 वर्षीय जितेंद्र हा गांधी नगरचा रहिवासी असून मानेसर परिसरात भाड्याने राहतो. उमेद सिंग नावाच्या व्यक्तीसोबत करारावर घेतलेल्या जमिनीत हे दोन खोल्यांचे घर बांधले आहे. 21 एप्रिल रोजी, उमेद सिंह यांने पोलिसात तक्रार केली होती. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “माझ्या शेजाऱ्याने मला फोन करून सांगितले की माझ्या शेतातील एका खोलीतून धूर निघताना दिसला. मी जेव्हा शेतात पोहोचलो तेव्हा मला खोलीत अर्धे जळालेले धड दिसले आणि याबाबत पोलिसांना कळवले.
दरम्यान, उमेद सिंगच्या तक्रारीच्या आधारे, मानेसर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा दडपणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. या महिलेची हत्या अन्य ठिकाणी झाल्याचा पोलिसांचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर 23 एप्रिल रोजी महिलेचे कापलेले दोन्ही हात आणि 26 एप्रिल रोजी सायंकाळी तिचे डोके खेरकिदौला पोलीस स्टेशन परिसरात आढळून आले होते. त्यानंतर तपासादरम्यान महिलेच्या पतीने हे हत्याकांड केल्याची माहिती समोर आली. त्याला अटक करण्यात आली असुन शुक्रवारी पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत.