Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्यात आला. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमी मजुराला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते अॅडमिट आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2026 | 02:03 PM
Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:

धूम स्टाईलने वाहन चालवण्याचे वाढते प्रकार
कारवाईची केली जात आहे मागणी
भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक

चिपळूण: शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीस्वाराने सायकलवरून जाणाऱ्या मजूर व्यक्तीस जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीचे मडगार्ड तुटून तब्बल १५ फूट लांब उडाले, मोठा आवाज झाल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार थांबण्याऐवजी धूम स्टाईलने वेगाने पळून गेला, रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो भरधाव वेगाने पसार झाला. अपघातग्रस्त मजूर इसमाच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव होत होता. व्यापारी अरुण भोजने व अन्य व्यापाऱ्यांनी तत्काळ त्याला उचलून सुरक्षित बाजूला केले.

यानंतर पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्यात आला. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमी मजुराला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते अॅडमिट आहेत. पोलिस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून दुचाकीस्वाराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, चिपळूण शहरात विशेषतः बाजारपेठ परिसरात धूम स्टाईलने वाहन चालवण्याचे प्रकार चाहले असून अपघात झाल्यानंतर मदत न करता पळून जाण्याची गंभीर बाब समोर येत आहे. अशा बेदरकार चालकांवर कठोर कारवाई करून याला आळा घालावा, अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले

सांगली शहरातील गजबजलेल्या गणपती पेठ परिसरात रविवारी सायंकाळी ‘हिट अँड रन’चा थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या एका कार चालकाने अवघ्या दहा ते बारा मिनिटांत बेदरकार वाहन चालवत चार पोलिस अंमलदारांसह तब्बल अकरा जणांना उडवले. पटेल चौक ते टिळक चौक या मार्गावर धडका देत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला अखेर जमावाने पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रविवारी सुटी असल्याने गणपती पेठ, कापडपेठ, सराफ पेठ परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. त्यातच कृष्णामाई महोत्सवामुळे भाविकांचीही वर्दळ होती. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) हा त्याची कार (एमएच १४ सीबी ४९००) घेऊन पटेल चौकात आला. नशेच्या अवस्थेत असलेल्या पांचाळने भरधाव वेगाने वाहन चालवत अनेक वाहनांना व नागरिकांना धडक दिली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Two wheeler hit labour in accident chiplun crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Accident Case
  • crime news
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
1

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.