crime (फोटो सौजन्य- social media)
छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने प्रेयसीचा गळा दाबून खून केला असल्याचा समोर आलं आहे. या हत्येतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि विविध कलमाखाली २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पुणे महापालिकेत दोन अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी; कारणही आलं समोर
नेमकं काय आहे प्रकरण?
आरोपीचं नाव सौरभ बंडू लाखे आहे. उपनिरीक्षक रमेश राठोड यांच्या तक्रारीनुसार सौरभ लाखे व त्यांची प्रेयसी लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावल्याने भांडण सुरू होते. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०८:३० वाजेच्या सुमारास सौरभ आणि त्याच्या साथीदारांनी प्रेयसीच्या राहत्या घरी गळा दाबून खून केला. त्यानंतर रूमला कुलूप लावून तो वैजापूर तालुक्यातील शिवूरला निघून गेला. १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी आरोपी परत प्रेयसीच्या घरी आला आणि त्याने प्रेयसीचे मुंडके व डावा हात कापून पिशवीमध्ये भरून दुचाकीवर शिऊर येतेच नेऊन फर्निचरच्या गोडाऊन मध्ये लपवला.
१७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी आरोपी सौरभ व त्याचा साथीदार कारमध्ये प्रेयसीच्या घरी आले. मुंडके आणि हात नसलेले धड कार मध्ये टाकून नेत होत. तेव्हा नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अटक केली. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. याबाबत सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्याच अनुषंगाने खटल्याच्या सुनावणी वेळी तत्कालीन निरीक्षक विनोद सलगरकर यांनी तपासानंतर दोषार पत्र दाखल केले. सहाय्यक लोक अभियोक्ता अरविंद परशुराम बागल यांनी २८ साक्षीदारांची जबाब नोंदविले. त्यात प्रेयसीची मैत्रीण इमारतीतील दोन भाडेकरू सी.सी.टीव्ही फुटेज डॉक्टर आणि पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्ह्यातील उर्वरित दोघांची सबळ पुराव्या अभावी निदोर्ष मुक्तता केली असल्याची माहिती सरकारी वकील अरविंद बागुल यांनी दिली आहे.
कुऱ्हाडीने वार करत नवऱ्यानेच बायकोला संपवलं; गोंदियातील घटना
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. आरती सुनील पटले (वय -३०) असे मृतकाचे नाव आहे. तर सुनील मदन पटले (वय- ३५) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंभोरा गावात घडली आहे. चरित्राच्या संशयावरून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. सुनीलने आरतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केले. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजार झाला. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
कुऱ्हाडीने वार करत नवऱ्यानेच बायकोला संपवलं; गोंदियातील घटना