शेतीच्या रस्त्यावर काट्या टाकल्याने झाला वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून शेतकऱ्याची हत्या (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. आरती सुनील पटले (वय -३०) असे मृतकाचे नाव आहे. तर सुनील मदन पटले (वय- ३५) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंभोरा गावात घडली आहे.
एक महिलेने रागात आपल्याच पतीच्या अंगावर ओतले तेल; उत्तर प्रदेशमध्ये खळबळ….
चरित्राच्या संशयावरून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. सुनीलने आरतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केले. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजार झाला. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
नेमकं काय घडलं?
रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि आरती यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दांपत्यास एक दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. गेल्या पाच वर्षापासून सुखाने नांदत असलेल्या सुनील आणि आरती यांच्यात चरित्राच्या संशयावरून गेल्या 6 महिन्यांपासून भांडण व्हायला सुरुवात झाली होती. सुनील पटले हा वारंवार आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता, ही बाब आरतीला खटकत होती.
गेल्या काही दिवसांपासून याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले होते. गुरुवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले, ज्यात सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडने पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच मरण पावली.यानंतर हत्येची घटना घडल्यावर सुनील पटलेने घटना स्थळावरून पळ काढला होता. मात्र, त्याने काही तासात स्वतः रावणवाडी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्या आणि अन्य आरोपांच्या खाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे आणि सुनील पटलेला न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपस पोलीस निरीक्षक मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नवकार हे करीत आहे.
बुलडाण्यात भीषण अपघात; भरधाव टिप्परने दोन बालकांना चिरडले, दुचाकीवरील आजी-आजोबाही गंभीर