Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manipur Violence: डोके शरीरापासून वेगळे केले, डोळे बाहेर काढले अन्…, निष्पाप मुलांसह 6 जणांची निर्घृण हत्या

Manipur Violence Marathi: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती अतिशय भयावह आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 28, 2024 | 02:03 PM
डोके शरीरापासून वेगळे केले, डोळे बाहेर काढले अन्..., निष्पाप मुलांसह 6 जणांची निर्घृण हत्या (फोटो सौजन्य-X)

डोके शरीरापासून वेगळे केले, डोळे बाहेर काढले अन्..., निष्पाप मुलांसह 6 जणांची निर्घृण हत्या (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Manipur Violence News In Marathi : भारताचा ईशान्येकडील भाद पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांनी धगधगत आहे. 15 नोव्हेंबरला मणिपूर आसाम राज्यांच्या सीमेवर असणाऱ्य जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मणिपूरमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. पुन्हा एकदा जाळपोळीच्या घटना घडू लागल्या. याचदरम्यान मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा निष्पाप व्यक्तींच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या हत्येचा शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती इतकी भयावह आहे की ऐकून थरकाप उड़ेल. या क्रौर्यामध्ये निष्पाप मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही सुटले नाही.

गोळ्यांच्या खुणा, शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि सर्वात वेदनादायक म्हणजे डोळे गायब..हे सर्व मिळून मानवतेला लाजवेल असे चित्र निर्माण करतात. ही केवळ हत्या नव्हती, तर मानवी मूल्यांना पूर्णपणे फाटा देणारा क्रूर अत्याचार करण्यात आला. मणिपूरमधील हे कुटुंब मेईतेई समुदायातील असल्याचे सांगण्यात येत असून कुकी अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये केलेल्या शवविच्छेदनानुसार, 10 महिन्यांच्या लैश्राम लमांगबा यांच्या शरीरावर चाव्याच्या जखमा होत्या, त्यांचे डोके कापले गेले होते आणि दोन्ही डोळे गायब होते.

राज्यातील एक-दोन नाहीतर तब्बल 187 नवनिर्वाचित आमदारांवर आहेत गुन्हे दाखल; आकडेवारीही आली समोर…

णिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा भागातून संशयित कुकी अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केले होते. काही दिवसांनंतर त्यांचे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यातील जिरी नदीत आणि आसामच्या दलदलीच्या किनारी सापडले.

आठ वर्षांच्या तेलन थजंगनबीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोटात गंभीर दुखापत झाली होती. तेलम थोईबी (31) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यात कवटीच्या हाडांचाही समावेश आहे. महिला, बालक आणि अर्भक यांचा शवविच्छेदन अहवाल बुधवारी सार्वजनिक करण्यात आला, त्यापूर्वी कुटुंबातील इतर तीन सदस्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले होते.

ही घटना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराची आणखी एक खोल जखम आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमधील दीर्घकाळ चाललेला तणाव आता भयानक हिंसाचारात उद्रेक होत आहे ज्याने संपूर्ण राज्य व्यापले आहे. शेकडो लोक मारले गेले आहेत, हजारो बेघर झाले आहेत आणि संपूर्ण समाज भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत जगत आहे.

ही घटना केवळ मणिपूरचीच नाही तर संपूर्ण देशाची शोकांतिका आहे. धर्म, जात आणि प्रदेशाच्या नावावर होणारी हिंसा किती घातक असू शकते याची आठवण करून देते. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात अपहरण झालेल्या सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन महिला आणि एका मुलानंतर उर्वरित तिघांचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही आले आहेत. एका 10 महिन्यांच्या चिमुरडीला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याने दहशतवाद्यांमधील क्रूरतेची पातळी लक्षात येते. जेव्हा अतिरेक्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मुलाचे दोन्ही डोळे काढले. सर्व मृतदेहांवर गोळ्यांच्या आणि क्रूर जखमांच्या खुणा आहेत. 17 नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा भागातून संशयित कुकी अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केले होते. पुढील काही दिवसांत, त्यांचे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यातील जिरी नदी आणि आसाममधील कछार येथील बराक नदीत सापडले.

Delhi Blast: अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान प्रशांत विहार परिसरात स्फोट, पोलीस घटनास्थळी पोहोचले

Web Title: Manipur violence six innocent members of a family killed in manipur jiribam district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 02:03 PM

Topics:  

  • Manipur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.