अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान प्रशांत विहार परिसरात स्फोट (फोटो सौजन्य-X)
Delhi Prashant Vihar Blast News In Marathi: दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामुळे आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्फोट कशामुळे झाला याची माहिती घेतली जात आहे. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. यापूर्वी २० ऑक्टोबरलाही प्रशांत विहार परिसरात स्फोट झाला होता. दिल्ली अग्निशमन सेवेनुसार गुरुवारी सकाळी 11:58 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार परिसरात असलेल्या बन्सी मिठाईसमोर रस्त्यावरील विक्रेत्याजवळ पार्क केलेल्या स्कूटरमध्ये हा स्फोट झाला. घटनास्थळी पांढऱ्या पावडरसारखी वस्तू आढळून आली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. 20 ऑक्टोबर रोजी रोहिणी भागातील प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेजवळही स्फोट झाला होता. स्फोटामुळे शाळेची भिंत, जवळपासची दुकाने आणि एका कारचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे पथकही तपासात गुंतले आहे. पोलिसांनी परिसर सील केला आहे. स्फोटामुळे काही वाहनांच्या काचा फुटल्या. जखमी ऑटोचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे. रस्त्यावर सापडलेल्या पांढऱ्या पावडरची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विहारच्या बन्सी स्वीट्समध्ये सकाळी ११.४८ वाजता पीसीआर कॉलवर संशयास्पद स्फोट झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. उद्यानाच्या सीमा भिंतीजवळ हा स्फोट झाला. घटनास्थळी पांढऱ्या पावडरसारखे काहीतरी विखुरलेले आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच याच परिसरात अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद सुरु होती.
दरम्यान, पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
20 ऑक्टोबर रोजी प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाला होता. तेथे पांढऱ्या पावडरसारखे काहीतरी आढळले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की शाळेच्या भक्कम भिंतीला खड्डा पडला आणि आजूबाजूची दुकाने आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) केंद्रीय यंत्रणांनी घटनास्थळाची पाहणी केली होती.
Abbott ने भारतात लहान मुलांसाठी 14-व्हॅलेंट न्यूमोकोकल लस बाजारात आणली !