Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravat Fire news: बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावती घटनेतील मृृृृृृत बालकाच्या बापाचा काळीज चिरणारा सवाल

अमरावती येथे पहाटे साडेतीनच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील नवजात अतिदक्षता विभागात आग लागली. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आणि ३६ बालकांची सुखरूप सुटका झाली असुन तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 25, 2026 | 01:43 PM
अमरावतीत NICUला भीषण आग; बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? बापाचा काळीज चिरणारा सवाल

अमरावतीत NICUला भीषण आग; बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? बापाचा काळीज चिरणारा सवाल

Follow Us
Follow Us:
  • पहाटे साडेतीनच्या सुमारास नवजात अतिदक्षता विभागात आग
  • तीन चिमुकल्यांचा मृत्यू; पालकांचा आक्रोश, रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्न
  • घटनेच्या चौकशीचे आदेश; आगीचे नेमके कारण तपासणीनंतर स्पष्ट होणार
Amravati news: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या विशेष नवजात शिशू उपचार विभागात ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, एका व्हेंटिलेटरमध्ये बिघाड होऊन त्यातून स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

आग लागल्याचे लक्षात येताच डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. विभागात उपचार घेत असलेल्या इतर नवजात बालकांना धुराच्या कोंडीतून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या विभागात एकूण ३९ बालकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ३६ बालकांची सुटका करण्यात आली असून, काही बालकांना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयांत हलविण्यात आले. सहा बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

या दुर्घटनेनंतर रुग्णालय परिसरात पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. काही कुटुंबांनी आपल्या चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. एका वडिलांनी, “बाळ गेल्याचं आईला कसं सांगू?” असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल केला. बाळाच्या जन्मानंतर घरात आनंदाचे वातावरण असताना काही दिवसांतच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मृत बालकांच्या शवविच्छेदनावरूनही काही पालकांनी नाराजी व्यक्त केली. “आमचं बाळ जसं आहे तसं परत द्या,” अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा :UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात आहे. रुग्णालयाचे नियमित फायर ऑडिट झाले होते, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला असून, सध्या तपासाचा केंद्रबिंदू आग लागण्यास कारणीभूत ठरलेल्या उपकरणावर आहे.
तीन नवजात बालकांच्या मृत्यूने अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Massive fire at nicu in amravati death of children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Amravati News

संबंधित बातम्या

अडीच कोटींची थकबाकी अन् कर्जाचा डोंगर! कंत्राटदाराच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय?
1

अडीच कोटींची थकबाकी अन् कर्जाचा डोंगर! कंत्राटदाराच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.