हॅकर्सकडून थेट महिला-बालविकास मंत्र्यांचे अकाऊंट हॅक; आदिती तटकरेंनी ट्वीट करत दिली माहिती
मुंबई: सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यात सायबर क्राइमचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या सायबर क्राईमचा फटका राज्याच्या बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देखील बसला आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात लोकांनी मंत्री अदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केले आहे.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आदिती तटकरे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता या अज्ञात हॅकर्सना शोधण्यात पोलिसांना यश येते का? ते पाहणे महवाचे असणार आहे. दरम्यान सातत्याने सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता राज्याच्या बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे देखील फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. ट्वीट करत त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे?
नमस्कार. माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व!
नमस्कार,
माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती.
याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 17, 2024
सायबर क्राईम आणि फेसबुक अकाऊंट हॅक होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आजवर, आतापर्यंत अनेक सर्वसामान्य नागरिक आणि सेलिब्रिटी यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत. फेसबुक अकाऊंट हॅक केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात असतो. तसेच फ्रेंडलिस्टमधील मित्रांकडे पैशांची मागणी देखील करत असतात. पैसे द्या नाहीतर चुकीचा मजकूर पोस्ट करू अशी धमकी दिली जाते. ऑनलाइन फसवणूक केली जाते. त्यामुळे अनोळखी लिंक, अनोळखी व्यक्ति यांच्यापासून जास्तीत जास्त सावध राहणे आवश्यक आहे.