Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

शेअर्स व आयपीओमध्ये सवलतीच्या दरात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची १ कोटी ४९ लाख ३३ हजार १५२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 12:30 AM
गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक
  • तब्बल दीड कोटींना घातला गंडा
पुणे : सातत्याने सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत कोट्यवधींना गंडा घालत असून, शेअर्स व आयपीओमध्ये सवलतीच्या दरात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची १ कोटी ४९ लाख ३३ हजार १५२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खराडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला. त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर शेअर्स व आयपीओमध्ये कमी दरात गुंतवणूक करता येईल, तसेच खात्रीशीर अलॉटमेंट मिळेल व मोठा नफा होईल, असे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी एका ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून शेअर्स व आयपीओमध्ये झालेला नफा असल्याचे बनावट आकडे दाखवून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण एक कोटी ४९ लाख ३३ हजार १५२ रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता आरोपींनी रक्कम परस्पर त्या पैशांचा अपहार केला. हा प्रकार २० जुलै २०२५ ते एक ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडला आहे.

तक्रारदाराला सहभागी करून घेण्यात आलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमीन व त्यांनी पैसे पाठविलेल्या विविध बँक खात्यांच्या धारकांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यासाठी सायबर पोलिसांकडून संबंधित बँक व्यवहारांचा तपास, मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण तसेच डिजिटल पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, गुंतवणुकीसंदर्भात अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक

राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज चोरटे वेगवेगळे आमिष दाखवत नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. गेल्या काही दिवसाखाली सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील दोन ज्येष्ठ नागरिकांना गुन्हे दाखल झाल्याचे सांगत त्यांना कारवाईची भिती दाखवत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. वानवडी तसेच एरंडवणा भागातील ज्येष्ठांना फसविले आहे.

Web Title: Thieves dupe senior citizen in pune with the lure of investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Froud News
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
4

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.