Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडील आणि भावाची केली हत्या, नंतर आईचा र्धवट जळालेला मृतदेह सापडला, अल्पवयीन मुलीला तीन वर्ष कैद आणि सामूहिक…

एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांना आणि भावाला आधी मारण्यात येत. त्यानंतर तिच्या आईचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळतो आणि अल्पवयीन मुलीला ३ वर्ष कैद करण्यात येते. एवढेच नाही तर तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 12, 2025 | 02:58 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांना आणि भावाला आधी मारण्यात येत. त्यानंतर तिच्या आईचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळतो आणि अल्पवयीन मुलीला ३ वर्ष कैद करण्यात येते. एवढेच नाही तर तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. ही घटना २००८ ते २०१५ मध्ये घडली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद शमीम अख्तर अद्याप फरार आहे. तर दोन आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

West Bengal Crime: MBBS विद्यार्थीनीवर तिघांकडून निर्घृण सामूहिक बलात्कार; जंगलात ओढत नेऊन केला अत्याचार

नेमकं काय घडलं?

ही धक्कदायक आणि संतापजनक घटना २००८ मध्ये सीतामढी जिल्ह्यातील महुआवा टोला या छोट्या गावातून सुरू झाली. अल्पवयीन मुलीचे वडील राजीव कुमार सिंह हे शाळेतील शिक्षक होते. एके दिवशी त्यांची ओळख मोहम्मद शमीम अख्तरशी झाली. तो गावात पत्रकार म्हणून कार्यरत होता. तो वारंवार त्यांच्या घरी येऊ जाऊ लागला. घरच्यांचा विश्वास संपादन केला आणि घरातील स्त्री-पुरुषांमध्ये मतभेद निर्माण केले. त्यानंतर त्यांच्या वाद होऊ लागला.

एके रात्री त्याने राजीव यांना नातेवाईक आजारी असल्याचे सांगून बाहेर बोलावले आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यांचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर काही काळातच राजीव यांचा 11 वर्षीय मुलगा अमनदीपही रहस्यमयरीत्या मृत अवस्थेत सापडला. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर पत्नी आणि 17 वर्षीय मुलगी मानसिक धक्क्यात होत्या.

शमीम त्यावेळी ‘मदतीचा हात’ म्हणून त्यांच्या आयुष्यात आला. 2009 मध्ये त्याने दोघींनाही पूर्वी चंपारणच्या ढाका येथील गांधी नगर भागात एका भाड्याच्या घरात नेले. काही काळाने रीना गायब झाली. महिनाभरानंतर जवळच्या शेतात एक अर्धजळालेला स्त्री मृतदेह सापडला, जो रीना हिचाच असल्याची शक्यता व्यक्त झाली, मात्र पोलीस त्याची अधिकृत ओळख पटवू शकले नाहीत.

दरवाज्याला बाहेरून दोन कुलुपं
यानंतर 17 वर्षीय मुलगी एकटी राहिली. शमीमने तिचं जगाशी नातं तोडलं. तिचा मोबाइल हिसकावून घेतला आणि तिला एका बंद घरात कैद केलं. दरवाज्याला बाहेरून दोन कुलुपं लावली जात होती. रोज वेगवेगळे लोक येऊन तिच्यावर अत्याचार करत. नशेची औषधं, इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केलं जात असे. या अमानुष कृत्यात शमीम अख्तरसोबत राजू मियां, इसरार मियां, माजिद, अमित आणि चंदन या सहा जणांचा सहभाग होता.

चोरीचा छापा मारण्यासाठी गेले आणि…

24 फेब्रुवारी 2015 रोजी वाहन चोरीच्या तपासात पोलीस त्या घरात छापा मारण्यासाठी गेले, त्यावेळी त्या घरात असलेला दृश्य बघून धक्काच बसला. कुलुपं तोडून आत गेल्यावर फाटकी कपडे घातलेली, अशक्त आणि अर्धवट शुद्धीत असलेली 17 वर्षीय मुलगी सापडली. घरभर मलमूत्राचे डाग, दुर्गंधी आणि अत्याचारांचे स्पष्ट पुरावे होते. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.मेडिकल तपासणीत तिच्यावर झालेल्या अत्याचारांची पुष्टी झाली. नंतर तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही दिवसांत राजू मियां आणि चंदन यांना अटक करण्यात आली

मला पूर्ण न्याय मिळाला नाही

2017 मध्ये हे प्रकरण न्यायालयात गेले. 17 वर्षीय मुलीचा जबाब आणि वैद्यकीय पुरावे पाहून न्यायालयाने 2022 मध्ये राजू मियां आणि इसरार मियां यांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 75 हजार रुपये दंड ठोठावला. इतर तीन आरोपी पुराव्याअभावी निर्दोष ठरले. निकालानंतर सिमरनने न्यायालयाबाहेर सांगितले, “मला पूर्ण न्याय मिळाला नाही. माझ्या आयुष्याचा नाश करणाऱ्या शमीम अख्तरलाही फाशी व्हायला हवी.”

हॉटेलमध्ये वेटरकडून ग्राहकावर हल्ला, दांडक्याने मारहाण; नेमकं काय घडलं?

Web Title: Minor girl sentenced to three years in prison and gang raped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • bihar

संबंधित बातम्या

सरकारी नोकरीची संधी! 379 क्रीडा प्रशिक्षक पदांसाठी भरती; अर्ज आजपासून सुरू, पदवीधर करू शकतात अर्ज
1

सरकारी नोकरीची संधी! 379 क्रीडा प्रशिक्षक पदांसाठी भरती; अर्ज आजपासून सुरू, पदवीधर करू शकतात अर्ज

Bihar Election 2025: महिला बुरखा घालून मतदान करू शकतील का? निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय
2

Bihar Election 2025: महिला बुरखा घालून मतदान करू शकतील का? निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
3

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
4

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.