Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime News: अकोला कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा गैरव्यवहार; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ७ जणांवर गुन्हा दाखल,१३८ मूळ फाईल्स गहाळ

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तब्बल ३८ लाख ७३ हजार रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराला अखेर कायदेशीर वळण मिळाले. ११५ संशयित देयके आणि १३८ मूळ फाईल्स गहाळ झाल्याच्या प्रकरणात संशोधन संचालकांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 03, 2026 | 01:36 PM
Akola Crime News: अकोला कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा गैरव्यवहार; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ७ जणांवर गुन्हा दाखल,१३८ मूळ फाईल्स गहाळ

Akola Crime News: अकोला कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा गैरव्यवहार; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ७ जणांवर गुन्हा दाखल,१३८ मूळ फाईल्स गहाळ

Follow Us
Follow Us:
  • ३८.७३ लाखांचा कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप
  • चौकशीत १३८ मूळ फाईल्स व कागदपत्रे गहाळ केल्याचा दावा
  • संशोधन संचालकांसह ७ जणांवर गुन्हा दाखल
Akola Scam News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तब्बल ३८ लाख ७३ हजार रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण अखेर पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. विद्यापीठातील विविध कामांच्या देयकांमध्ये अनियमितता, बनावट कागदपत्रांचा वापर आणि मूळ फाईल्स गहाळ केल्याच्या आरोपांप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विद्यापीठाचे सध्याचे संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने यांच्यासह तत्कालीन अधिकारी, कर्मचारी आणि एका खासगी कंत्राटदाराचा समावेश आहे.

या प्रकरणाची सुरुवात विद्यापीठातील विविध कामांच्या देयकांमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या चौकशीतून झाली. विद्यापीठ प्रशासनाने यासाठी विशेष चौकशी समित्या नियुक्त केल्या होत्या. समित्यांनी देयके, कामांच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असता आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले.

११५ बनावट देयकांचा संशय

चौकशीदरम्यान तब्बल ११५ देयके बनावट असल्याचे आढळून आल्याचा आरोप आहे. त्याच कामासाठी एकापेक्षा अधिक वेळा देयके काढण्यात आल्याचेही तपासात समोर आले. या माध्यमातून विद्यापीठाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे संबंधित कामांच्या १३८ मूळ फाईल्स आणि कागदपत्रे गहाळ असल्याचे आढळले. त्यामुळे देयकांची प्रक्रिया, प्रत्यक्ष कामे आणि त्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यास अडचणी निर्माण झाल्या.

हेही वाचा: Nashik Scam News: म्हाडा भूखंड प्रकरणात महसूल विभागाला मोठा धक्का; एसआयटी चौकशीनंतर ४ जण निलंबित

कुलगुरूंच्या मान्यतेनंतर पोलिसांत तक्रार

चौकशी समित्यांच्या अहवालानंतर विद्यापीठ प्रशासनाने पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. १७ जून २०२६ रोजी कुलगुरूंच्या मान्यतेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्याबाबत कुलसचिव कार्यालयाने लेखी आदेश दिले. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन २९ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे डॉ. श्यामसुंदर माने, हंसराज राठोड, सौरभ मोरे, विलास गुल्हाने, पंकज पाल, मदन लांजेवार आणि खासगी कंत्राटदार संतोष म्हातारमारे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पंकज पाल आणि मदन लांजेवार यांचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील प्रतिष्ठित कृषी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या कथित गैरव्यवहाराची व्याप्ती आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे स्पष्ट होणार आहे.

Web Title: Misappropriation of 38 lakh at akola agricultural university case registered against 7 individuals including officers and staff 138 original files missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 01:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.