
मुंबईतील गुन्हेगारी संपायचे नाव घेत नाही. त्यातच आता दीड वर्षाच्या मुलाची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. मालिका आणि चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या दीड वर्षाच्या मुलाला 4.65 लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल. सकीना नावाच्या महिलेने पीडितेशी मैत्री केली आणि तिच्या मुलाला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळेल आणि या कामासाठी त्याला चांगले पैसेही मिळतील, असे सांगून पीडित महिलेने सकीनाच्या जाळ्यात पडून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला दहा दिवसांसाठी सकीनाच्या स्वाधीन केले. मात्र दहा दिवस उलटून ही मूल परत करत नसल्याने पीडितेला संशय आला तिने याप्रकरणी पोलिसांना तक्रार केली.
मुलाला 10 दिवस दिले ताब्यात
तक्रारदार महिला पती आणि तीन मुलांसह मालाडच्या मालवणी परिसरात राहते. त्यांचा धाकटा मुलगा दीड वर्षांचा आहे. पीडित मुलगी आणि आरोपी सकिना यांची एप्रिल महिन्यात भेट झाली आणि दोघे चांगल्या मैत्रिणी होत्या. दरम्यान, सकीनाने पीडित महिलेल्या तिच्या मैत्रिणीबद्दल सांगितले, साबिया फिल्म इंडस्ट्रीत काम करते अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी तिला लहान मुलांची गरज आहे. ज्यासाठी ती चांगले पैसेही देते. लोभापोटी पीडितेने सकीनावर विश्वास ठेवून तिच्या दीड वर्षाच्या मुलाला 10 दिवसांसाठी सकीनाकडे स्वाधीन केले.
मुलगा परत न आल्याने संशय…
दहा-पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही सकीना मुलाला परत देण्यास नकार देऊ लागल्याने पीडितेला संशय आला. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना माहिती मिळाली. शकीनाने 5 वेगवेगळ्या आरोपींच्या मदतीने मुलाला अंधेरीच्या इंदिरानगर भागातील एका जोडप्याला 4 लाख 65 हजार रुपयांना विकले. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
जन्मदात्यांनीच केली दीड वर्षाच्या चिमुकल्याची विक्री
पोलिसांनी मेहेरवाल यांची चौकशी केली, तेव्हा याचिकाकर्त्याने सांगितले की, सायबाने आम्हाला 4.65 लाखांना हसनैनला विकले. याप्रकरणी पोलिसांनी सायबा आणि अन्य आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी मुलाचे आई-वडील नजमीन आणि आझाद शेख उर्फ बादशाह यांनीच एजंट सकीनाबांनो शेख, राबिया परवीन अन्सारी, सायबा अन्सारी आणि इंद्रदीप उर्फ इंदर हरिराम मेहरवाल या एजंटच्या मदतीने पोटच्या पोराला गे जोडप्याला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र यानंतर नजमीन मुलाची पुन्हा आठवण येऊ लागल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईतील डीएन नगर पोलिसांनी बाल तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी विविध भागातून 6 आरोपींना अटक केली आहे. नजमीन मोहम्मद आझाद शेख, मोहम्मद आझाद अबुल शेख, सकिनाबानो शकील शेख, राबिया इस्लाम अली अन्सारी, सायबा सफुद्दीन अन्सारी आणि इंदरदीप उर्फ इंदर हरिराम मेहरवाल अशी या 6 आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर या आरोपींना अंधेरीच्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तस्करीत बळी पडलेल्या मुलाची सुखरूप सुटका करून त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली.