Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किन्नर शब्दाचा अर्थ काय ? ब्रम्हदेवांची मुलं किन्नर होती का ? पुराणात केला आहे याचा खुलासा

राणाचा विचार करायचा झालाच तर असं म्हणतात की ब्रम्हदेवांची दोन मुलं किन्नर होती. किन्नर म्हणजे नेमके कोण ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 04, 2026 | 02:12 PM
किन्नर शब्दाचा अर्थ काय ? ब्रम्हदेवांची मुलं किन्नर होती का ? पुराणात केला आहे याचा खुलासा
Follow Us
Close
Follow Us:
  • किन्नर शब्दाचा अर्थ काय ?
  • किन्ररांचा मूळ व्यवसाय कोणता होता?
  • ब्रम्हदेवांची मुलं किन्नर होती का ?
शरीर माणसाचं पण वागणूक स्त्रियांसारखी अशांना साधारणत: समाजात किन्नर म्हणून हिणवलं जातं. त्यांच्या चारित्र्याविषयी चुकीच्या समजूती देखील बाळगल्या जातात. मात्र सध्याच्या काळात या विषयी आवाज उठवला जात असल्याने तृतीयपंथीयांकडे सुशिक्षित लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलेला दिसून येतो. मात्र किन्नर म्हणजे नेमके कोण ? पुराणाचा विचार करायचा झालाच तर असं म्हणतात की ब्रम्हदेवांची दोन मुलं किन्नर होती. किन्नर असणं चूकीचं आहे का या सगळ्याबाबत आज जाणून घेऊयात.

ब्रम्हदेवांची मुलं किन्नर होती का ?

आजवर अनेक तृतीयपंथीयांनी त्यांच्या अस्तित्वासाठी आणि स्वातंत्र्यासाठी बंड पुकारलं. यातील एक नाव म्हणजे गौरी सावंत. एका पॉडकास्टमध्ये गौरी सावंत यांनी हिंदू धर्मातील संस्कृती आणि पंरपरांचा आधार घेत किन्नरांचं महत्व सांगितलं आहे. पॉडकास्टमध्ये सांगताना गौरी सावंत म्हणाल्या की, ब्रम्हदेवांना दोन मुलं होती आणि ही मुलं किन्नर होती. पौराणिक कथेनुसार पाहायचं झालं तर समुद्रमंथामध्ये विष्णूदेवांनी मोहिनी अवतार घेतला होता. अजून सविस्तर सांगायचं झालं तर ग्रहमालिकेतील बुध ग्रह हा नपुंसकलिंग मानला जातो. असं म्हटलं जातं की त्याला स्वत:चं अस्तित्व नाही. मात्र ज्योतिषशास्त्रानुसाल ज्याची आर्थिक बाजू कमकुवत आहे त्याला बुधाची उपासना करायाला सांगतात. पत्रिकेत बुध निचेचा असला की, त्या व्यक्तीला उजव्या करंगळीत पाचू धारण करायला सांगतात. किंवा किन्नरांना दान करा असं म्हटलं जातं. अनेकदा हिरवे मूग, हिरवी साडी किंवा हिरव्या बांगड्या किन्नरांना दान द्या हा सल्ला देखील दिला जातो. दान हे सुपात्र असायला लागतं.

 

Budh Gochar 2026: बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, करिअर, पैसा आणि प्रगतीत होईल वाढ

किन्नरांचं मूळ काय ?

पुराणानुसार किन्नरांचं मुळ पाहायला गेलं तर त्याची देखील वेगळी आख्यायिका आहे. गौैरी सावंत यांनी सांगितलं की, जेव्हा परशुरामाने क्षत्रियांचा नाश करायचं ठरवलं तेव्हा काही राजांनी जीव वाचवण्याकरिता साडी नेसली आणि ते रेणूका मातेला शरण गेले. जेव्हा एखादा पुरुष साडी नेसतो तेव्हा त्याच्यातला पुरुषार्थ संपलेला असतो. तेव्हा तो एखाद्या स्त्रीकडे पाहताना चुकीच्या नजरेने पाहत नाही. जेव्हा रेणूका मातेने परशुरामाला शह दिला त्यावेळी अक्कया आणि जोगया या दोन्ही राजांना तिने शिष्य करुन घेतलं. त्यानंर देवळातील पुजारी हे आधीच्या काळात किन्नर समाजाचे असायचे. देवळातील जे काही पौैरोहित्य असे ते किन्नर करत होते. विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील देवीच्या देवळातील पौरोहित्य करणारे पुजारी हे किन्नर होते. हा धार्मिकदृष्ट्या किन्नरांचं मूळ होतं.

कालांतराने ब्रिटीश आणि मुघलांच्या काळात जेव्हा देवळं पाडायला सुुुरुवात झाली त्यावेळी किन्ररांचं अस्तित्व लयाला येत गेलं. ब्रिटीश राजवटीच्या काळात किन्नरांवर अस्तित्वावर कायदा लादण्यात आला त्यावेळी अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी हे पौरोहित्य करणारे सिग्नलवर भिक मागून, टाळ्या वाजवून स्वत:चं पोट भरायला लागले आणि मग पुढच्या पिढ्यांमध्ये किन्नरांविषयीते गैरसमज दृढ होत गेले. मूळ किन्नर समाज हा पुर्वीच्या काळी देवीचं पौरोहित्य करणारे असतं असं गौरा सावंत यांनी सांगितलं.

Dhan Shakti Rajyog: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, प्रत्येक कामात मिळेल यश

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: What is the meaning of the word kinnar were the children of brahmadev eunuchs this has been revealed in the puranas gauri sawant podcast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • hindu religion
  • Transgenders

संबंधित बातम्या

Bhogi 2026: भोगी सण कधी आहे? महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या
1

Bhogi 2026: भोगी सण कधी आहे? महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या

मृत व्यक्तीची निंदा केल्याने काय होते? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या
2

मृत व्यक्तीची निंदा केल्याने काय होते? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात
3

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

कोकणातील सर्वात गूढ देवस्थान; वारुळातून अवतरलेल्या सातेरी देवी मंदिराची रहस्यमय कथा
4

कोकणातील सर्वात गूढ देवस्थान; वारुळातून अवतरलेल्या सातेरी देवी मंदिराची रहस्यमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.