Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: ‘लग्नासाठी पैशांची गरज’… सावत्र सुनेचा भयानक कट; सीसीटीव्ही फुटेजवरून हत्येचा उलगडा, काय आहे प्रकरण?

लग्नासाठी पैशांची गरज असल्यामुळे सावत्र सुनेने घरातील व्यक्तीच्या हत्येचा भयानक कट रचला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आणि आरोपींना ताब्यात घेतले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 11:41 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नासाठी पैशांची गरज असल्याने सावत्र सुनेने हत्येचा भयानक कट रचला.
  • सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला.
  • पोलिसांनी पुरावे तपासून आरोपींना अटक केली.
मुंबई: मुंबईतील घाटकोपरमधून एक हत्येची घटना समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपरमध्ये एका 65 वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे समोर आले होते. हत्या झालेल्या महिलेचं नाव शहनाज काझी असे आहे. पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता पोलिसांपुढे आरोपींना शोधण्याचा आवाहन होते. पोलिसांनी आरोपीला शोधले असून आरोपी दुसरं तिसरं कोणी नाही तर मृत महिलेची सावत्र सून आहे. आता प्रश्न असा की सावत्र सुनेने हत्या का केली? पोलिसांनी तिला अटक केली केली? जाणून घ्या.

Gondia : वडिलांसोबत शेतात गेली आणि काळाने घात केला! बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; गोंदिया येथील घटना

कशी केली अटक?

पोलिसांना बुधवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपरच्या हिमालय सोसायटीमध्ये एका ६५ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी आसपासच्या 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बुरखा घातलेली एक महिला घाई-घाईत जाताना दिसली. फुटेजमध्ये महिलेच्या पायात दिसणाऱ्या बुटांमुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. दुसऱ्यादिवशी पोलीस घटनास्थळी पुन्हा चौकशी करण्यासाठी गेले असता, तेव्हा तीच महिला तेच बूट आणि बुरखा घालून पोलिसांसमोर आली होती. तेव्हा पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि तिला अटक करण्यात आली. आरोपीचं नाव मुमताज असे आहे.

का केली हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुमताजच्या मुलीचं लग्न होणार होतं आणि लग्नाच्या खर्चासाठी जास्त पैशांची गरज होती. शहनाज ही तिची सावत्र सासू होती. तिचा पती अनीस काझीच्या मृत्यूनंतर, शहनाजने अलीकडेच जरीमरी परिसरातील त्याची संपत्ती विकली होती आणि त्यातून तिला लाखो रुपये मिळाले होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहनाजने यापूर्वी खूप वेळा आर्थिक मदत केली होती, परंतु मुमताजला त्यांच्याकडून संपत्तीचा मोठा वाटा हवा होता.

कशी केली हत्या?

मुमताज बुधवारी हँड ग्लोव्ह्ज, बुरखा घालून आणि सोबत नायलॉनची दोरी घेऊन मुकुंद सोसायटीच्या फ्लॅट नं. A13 मध्ये शिरली. शहनाज त्यावेळी स्वयंपाक करत होती. घरात शिरल्यानंतर, तिने आधी धार्मिक पुस्तके वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेहलने शहनाजवर वार केला. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर, आरोपीने महिलेने शहनाजकडून पैसे मागितले.

शेजाऱ्यांना आढळली मृतावस्थेत

त्यावेळी शहनाजच्या बहिणीने तिला फोन केला होता. शहनाजने तिच्या बहिणीचा फोन उचलला नाही. तर तिने शहनाजच्या शेजारी राहणाऱ्या अन्सारी कुटुंबियांना फोन केला आणि त्यांना शहनाजच्या घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर, शेजारच्यांनी बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर, बाजूच्या घरात असलेल्या चावीने दार उघडण्यात आलं आणि तेव्हा शहनाज जमिनीवर मृतावस्थेत आढळली.

आरोपी अटकेत

शहनाजच्या पती अनीसने दोन लग्न केली होती. शहनाज ही त्याची पहिली पत्नी तिला मुल झालं नाही. त्यानंतर, त्याने आयशा नावाच्या महिलेसोबत लग्न होतं. आयशाने सुद्धा अनीससोबत दुसरं लग्न केलं. तिच्या पहिल्या लग्नापासून चार मुलं आणि नंतर, अनीसपासून तिला तीन मुलं झाली. आयशाचा मुलगा इरफानसोबत मुमताजचं लग्न झालं होतं. पोलिसांनी मुमताजला अटक केली आहे. पोलिसांनी तिला न्यालयात हजर केले असून ४ डिसेंबर पर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Kalyan Crime: धक्कादायक! धाब्यावर बसल्या बसल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या! कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: आरोपी सावत्र सुनेला तिच्या लग्नासाठी पैशांची गरज होती, म्हणून तिने पैशांसाठी हा भयानक कट रचला.

  • Que: पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा कसा केला?

    Ans: घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संपूर्ण कट उघड केला.

Web Title: Mumbai crime step daughter in laws murder murder revealed from cctv footage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
1

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत
2

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरा, पण जबाबदारी विसरू नका! एआय-निर्मित युक्तिवादावर हायकोर्ट संतप्त
3

आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरा, पण जबाबदारी विसरू नका! एआय-निर्मित युक्तिवादावर हायकोर्ट संतप्त

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
4

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.