मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना, ऑडी कारची 2 रिक्षांना धडक (फोटो सौजन्य-ट्विटर)
मुंबईतील वरळीतील हिट अँड रनची घटना ताजी असताना आज (22 जुलै) पुन्हा मुलुंड परिसरात हिट अँड रनची घटना घडली. ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिलीय. या घटनेनंतर ऑडी कार चालक फरार झालाय. या घटनेत रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झालेयत. रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर सांगण्यात आली आहे. अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.
हे सुद्धा वाचा: ‘तुम्ही भारतातील परीक्षेची सिस्टीम विकत घेऊ शकता,’ राहुल गांधींची धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका
मुलुंडमध्ये आज (22 जुलै) सकाळच्या वेळेत घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेने खळबळ माजली आहे. भरधाव ऑडी कारने दोन रिक्षाचालकांना धडक दिली. या अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु केला. तसेच चालकाचा कसून तपास सुरु केला. या अपघातात प्रवासी आणि चालत गंभीर जखमी झाले आहेत. तसेच एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वरळीत हिट अँड रनची घटना घडली होती. भरधाव ऑडी कारमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या पती आणि पत्नीला चिरडले होते. वरळीच्या अट्रिका मॉसजवळ हा अपघात घडला होता. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या महिलेला ऑडी कार चालकाने 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. कारचालक मद्यधुंतीत होता. याप्रकरणी कारचालक मिहीर शहाला वरळी पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.