'तुम्ही भारतातील परीक्षेची सिस्टीम विकत घेऊ शकता,' राहुल गांधींची धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका (फोटो सौजन्य-ट्विटर)
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याचदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी संसदेत NEET वर चर्चेदरम्यान बोलताना सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. सपा अध्यक्ष म्हणाले, जर हे मंत्री (धर्मेंद्र प्रधान) असेच राहिले तर न्याय मिळणार नाही. त्याचवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टिका केली. काय म्हणाले राहुल गांधी जाणून घेऊया…
हे सुद्धा वाचा: तुमच्यात दम असेल तर…; फडणवीसांच्या त्या विधानावर संजय राऊतांचे खुले आव्हान
काँग्रेसचे खासदार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टिका केली. नीट पेपर फुटीनंतर संपूर्ण देशाला हे स्पष्ट झाले आहे की, आपल्या परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहे. केवळ NEET मध्येच नाही तर सर्व प्रमुख परीक्षांमध्येही गोंधळ दिसून येत आहे. मंत्री (धर्मेंद्र प्रधान) यांनी स्वतःला सोडून बाकी सगळ्यांना दोषी ठरवले आहे. मला वाटत नाही की, त्यांना येथे काय चालले आहे याची मूलभूत माहिती देखील समजते. “तसेच प्रश्न फक्त नीट पेपर फुटीचा नाही तर देशातील एकूण सिस्टीमचा आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही भारतातील परीक्षेची सिस्टीम विकत घेऊ शकतात. तुम्ही या सिस्टीमवर काय करत आहात”, अशी टिका राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर केली.
हे सुद्धा वाचा: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आस्थापना रडारवर! पुणे पोलिसांकडून कारवाई होणार
संसदेत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, केवळ आरडाओरडा करून खोटे सत्य बनत नाही. देशाची परीक्षा पद्धत मूर्खपणाची असल्याचे विरोधी पक्षनेत्याचे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. विरोधी पक्षनेत्याचे काहीही होऊ शकत नाही. संपूर्ण परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. असं प्रत्युत्तर धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींच्या टिकेला दिले आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गदारोळाच्या दरम्यान सांगितले की परीक्षेत सुधारणा कशी करता येईल यावर सूचना द्याव्यात. व्यवस्था सुधारण्याच्या सूचना येथे दिल्या पाहिजेत. आरोप-प्रत्यारोप करून काहीही साध्य होत नाही. सरकार सर्व सूचना मान्य करेल.