Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking : मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या; नेमकं काय प्रकरण?

Mumbai Taj Hotel Breaking : ताज हॉटेलच्या परिसरात एकाच नंबरप्लेटच्या दोन कार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये चेक इन केलं जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 06, 2025 | 03:39 PM
मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या; नेमकं काय प्रकरण? (फोटो सौजन्य-X)

मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या; नेमकं काय प्रकरण? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Taj Hotel Breaking News Marathi: मुंबईतील जगप्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. हॉटेलमध्ये एकाच मॉडेलच्या दोन गाड्या सापडल्या आहेत, ज्यांच्या नंबर प्लेट्स सारख्याच आहेत. या घटनेने हॉटेलमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या सापडल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कारण ताज हॉटेल अतिशय संवेदनशील परिसरात आहे. ताज हॉटेल सुरक्षेच्या बाबतीत नेहमीच हाय अलर्टवर असते, त्यामुळे अशी घटना अत्यंत धक्कादायक आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एका कार चालकाने चालान टाळण्यासाठी कारची नंबर प्लेट बदलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मूळ नंबर प्लेट असलेली कारही हॉटेलमध्ये पार्क केलेली आढळून आली. मूळ गाडीच्या मालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

‘या’ खासगी कंपनीकडून गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक, जादा परताव्याचे आमिष दाखवून घातला गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (6  जानेवारी) दुपारी एकच्या सुमारास ही दोन्ही वाहने मुंबईतील ताज हॉटेलसमोर उभी असलेली दिसली. त्यानंतर मूळ नोंदणी असलेल्या वाहन चालकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाची दखल घेत दोन्ही वाहने कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आली, त्यानंतर आता ताज हॉटेलसमोर उभी असलेली दुसरी गाडी कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत.

ताज हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दोन्ही वाहनांचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही वाहने मारुती सुझुकीची असल्याचे दिसत आहे. यापैकी एक वाहन अर्टिगा आहे. ज्याचा क्रमांक MH01EE2388 आहे. तर मागे उभ्या असलेल्या कारचाही हाच क्रमांक आहे. मात्र, दुसरे वाहन कोणत्या मॉडेलचे आहे हे कळू शकलेले नाही.

पोलिसांनी तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच, कुलाबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही कारची तपासणी सुरू केली. पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्या आहेत. एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या हॉटेलच्या आत कशा आल्या याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रकरण लवकरच उघड होईल, असे ते म्हणाले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, आम्ही एका ड्रायव्हरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे ज्याने सांगितले की त्याने मुंबईतील ताजमहाल हॉटेलजवळ त्याच्या कारप्रमाणेच नंबर असलेली कार पाहिली आहे.

दरम्यान 26 नोव्हेंबर 2008 रोजी या आलिशान हॉटेलवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 600 रुम आणि 44 सूट असलेल्या ताज हॉटेलवर झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर ताज हॉटेलभोवती कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खळबळजनक! महिलेच्या गळ्याला तलवार लावून चोरीचा प्रयत्न; शिरुरमधील घटना

Web Title: Mumbai police register fir after two cars with same number plate spotted outside taj mahal hotel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.