Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील ‘या’ पुलाचे नामकरण, आता ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ असे करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी या पुलाचे नामकरण करण्यात आले असून 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' असे करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2026 | 05:51 PM
मुंबईतील 'या' पुलाचे नामकरण, आता 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' असे करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबईतील 'या' पुलाचे नामकरण, आता 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' असे करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ 15 महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाचे पुनर्बांधणी काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन बृहृन्मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध नियोजनद्वारे अतिशय वेगाने या पुलाची पुर्नबांधणी विहीत मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग यांचे अभिनंदन मुख्यमंत्री यांनी केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून होईल. महानगरपालिकेत निर्वाचित प्रतिनिधी आल्याने महानगरपालिकेच्या कामाला अधिक गती आणि अधिक लोकाभिमुखता येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू

पुलाचे नामकरण

मुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले मंदिरे, घाट, या सर्व कामातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण घेतो कारण त्यांच्यासारखे जे उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते. म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने विहीत मुदतीच्या आत यशस्वरित्या या पुलाचे काम पूर्ण केले आहे.नागरिकांसाठी हा पूल खुप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळित वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले आहे. यासाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प या शासनाने वेगाने पूर्ण केलेली आहेत. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही महानगरपालिका करत राहिल,असा विश्वास व्यक्त करत महानगरपालिकेने अशाच पद्धतीने गतीने आणि दर्जदार कामे करावीत.

Central Railway : गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, ‘मरे’वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा

Web Title: The bridge near mumbai central railway station will be renamed it will now be called punyashlok rajmata ahilyadevi holkar bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • central railway
  • devendra fadnavis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित! देशातील पहिली ‘नॉन-एसी’ बंद दरवाज्यांची लोकल दाखल; कधीपासून सुरू होणार प्रवास?
1

Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित! देशातील पहिली ‘नॉन-एसी’ बंद दरवाज्यांची लोकल दाखल; कधीपासून सुरू होणार प्रवास?

Central Railway News: मध्य रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा! वर्षभरात 251 कोटींचा विक्रमी दंड वसूल; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
2

Central Railway News: मध्य रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा! वर्षभरात 251 कोटींचा विक्रमी दंड वसूल; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

Bullet Train Project: जमिनीखाली 130 फुटांवर बुलेट ट्रेनचा ‘महाकाय’ प्रकल्प! दुसऱ्या TBM ची असेंबलिंग सुरू; पाहा कशी होणार खोदणी
3

Bullet Train Project: जमिनीखाली 130 फुटांवर बुलेट ट्रेनचा ‘महाकाय’ प्रकल्प! दुसऱ्या TBM ची असेंबलिंग सुरू; पाहा कशी होणार खोदणी

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक
4

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.