धक्कादायक! अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
अमरावती : दारू पाजण्याच्या बहाण्याने शेतात नेवून एका व्यक्तीची लोखंडी सळईने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.29) रात्री साडे आठच्या सुमारास तळेगाव ते निमगव्हाण रस्त्यावर उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मनोज वामनराव नागापुरे (40 रा. तळेगाव) असे मृताचे तर उमेश शिवा शिंदे (रा. तळेगाव) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी नागपूर-औरंगाबाद रस्त्यावर तळेगाव ते निमगव्हाण गेटदरम्यान एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास केला असता खुनाचा गुन्हा असल्याचे लक्षात आले. तो मृतदेह मनोज नागापुरे यांचा असल्याची ओळख पटली. अज्ञात आरोपीने डोक्यात लोखंडी सळईने वार करून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.
दरम्यान, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा भाऊ सुनील वामनराव नागापूरे (रा. तळेगाव) त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश तळेगाव पोलिस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आले होते. तसेच वेगवेगळे तपास पथके बनवून तपास करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांनी हत्येत गावातील एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली
पोलिसांनी उमेश शिंदे याची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. त्याचे मृतकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने व प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याने त्याची हत्या केल्याची चर्चा परिसरात होती. घटनेच्या दिवशी आरोपी उमेशने मनोजला दारू पाजण्याच्या बहाण्याने त्याच्या शेतात नेले व लोखंडी गजाने त्याच्या डोक्यावर वार करून हत्या केली आणि त्याचा मृतदेह रस्त्यावर आणून ठेवला व अपघात असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास तळेगाव पोलिस करीत आहेत.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात कारवाई
कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिस पी.आय. किरण वानखडे, ठाणेदार रामेश्वर धोंडगे, पो.कॉ. मोहम्मद तस्लीम, पी.ओ.एन. सागर हटवार, प्रवर्ग पीएसआय मुलचंद भांबूरकर तसेच ग्रामीण गुन्हे शाखा व तळेगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.