अमरावती शहरातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
दारू पिण्यावरून मुलगा व वडील यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. तर झोपेत असलेल्या ३२ वर्षीय मुलावर पित्याने काठीने वार केले. यामध्ये जबर दुखापत होऊन मुलाचा मृत्यू झाला.
कुख्यात अभिषेक आणि त्याचा अन्य साथीदार दुचाकीवरून वडाळीकडे जात होते. याचवेळी हल्लेखोरांनी दिव्य सदन केंद्राजवळ धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात डोक्याला जबर मार लागल्याने अभिषेक खाली पडला.
प्रज्वल पाथरे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते.
मोर्शीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मायवाडी येथील दुर्गादास पांडुरंग नेहारे हा 6 जानेवारीपासून घरून बेपत्ता होता. याची फिर्याद मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी उमेश शिंदे याची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. त्याचे मृतकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने व प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याने त्याची हत्या केल्याची चर्चा परिसरात होती.
शुभांगी (२६) असे मृत युवतीचे नाव आहे. शुभांगीच्या परिचयातील तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याचे शुभांगीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या प्रेयसीला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे तरुणाने…
उमेश कोल्हेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. उमेशने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रमाणेच उमेश कोल्हेचीही हत्या झाली. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्रातील उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार हत्येमागील कट,…