Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदर्शनाला नेण्याच्या बहाण्याने पत्नीचा दरीत ढकलून खून; पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार; तरुणास अटक

  • By युवराज भगत
Updated On: Jan 15, 2024 | 09:17 PM
देवदर्शनाला नेण्याच्या बहाण्याने पत्नीचा दरीत ढकलून खून; पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार; तरुणास अटक
Follow Us
Follow Us:

पुणे : पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत भागात नेऊन तिचा दरीत ढकलून देत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला दरीत पडल्यानंतर ती झाडात अडकली. त्यानंतर तरुणाने तेथे जाऊन साडीने तिचा गळा आवळून खून केला. पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून, बेपत्ता घटनेच्या तपासात ही बाब उघड झाली आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार

ललिता अमोलसिंग जाधव (वय ३६, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय २६) याला अटक केली आहे. पोलीस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसी खाक्या दाखविताच पतीने दिली खुनाची कबुली

पोलिसांच्या माहितीनुसार, अमोलसिंगने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षी (ऑक्टोबर २०२३) महिन्यात दिली होती. या बेपत्ता तक्रारीचा लोणीकंद पोलीस तपास करत होते. तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.

कुटुंबीयांच्या दबाबामुळे वयाने मोठ्या ललिताशी विवाह

अमोलसिंगने कुटुंबीयांच्या दबाबामुळे वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला होता. दोघांत दहा वर्षांचे अंतर होते. त्याचे पत्नीशी वाद व्हायचे. वयाने मोठी असल्याने पत्नीला त्याने सोडचिठ्ठी देण्यास सांगितले. मात्र, ललिताने सोडचिठ्ठी दिली नाही.

त्यांच्यात कायम वाद होत असत. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी भाडेतत्त्वावर कार घेऊन दोघे सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे दर्शनासाठी निघाल्याचे सांगून बाहेर पडले. मांढरदेवी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने मोटारचालकाला मोटार वाहनतळावर लावण्यास सांगितले. त्यानंतर दोघे जण घाटातून चालत निघाले. घाटात ललिताशी गप्पा मारण्याचा बहाणा केला.

मृतदेह दरीत ढकलून तो पसार

दरीजवळ थांबलेल्या ललिताला त्याने धक्का दिल्याने ती दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर ती झाडाच्या फांदीत अडकली. अमोलसिंग दरीत उतरला. साडीने गळा आवळून तिचा खून केला. ती मरण पावल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह दरीत ढकलून तो पसार झाल्याची माहिती तपासात उघड झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Murder of wife by pushing her into a valley on pretext of taking her to god false complaint of missing wife youth arrested nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 08:04 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
1

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.