Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरात ‘LSD’ ड्रग्सचा शिरकाव; पोलिसांची मोठी कारवाई, विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनामुळे चिंता

नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘LSD’ या घातक ड्रग्सचा साठा जप्त केला. उच्चभ्रू भागातील तरुण आणि विद्यार्थी या व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 05:52 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नागपूर पोलिसांनी LSD ड्रग्सचा साठा जप्त केला.
  • तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यसन वाढत असल्याची चिंता.
  • पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
नागपूर : शहरात अमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी नागपूर पोलीस दलाने मोठी कारवाई करत विविध ठिकाणी छापेमारी केली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी ‘LSD’ (Lysergic Acid Diethylamide) या अत्यंत घातक आणि महागड्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या नव्या प्रकारच्या ड्रग्सचा नागपुरात शिरकाव झाल्याने पोलीस प्रशासनासह पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

Satara Crime: साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, LSD हे अत्यंत धोकादायक ड्रग्स असून ते प्रामुख्याने कागदाच्या छोट्या तुकड्यांच्या स्वरूपात विकले जाते. हे ड्रग्स ओळखणे अत्यंत कठीण असते. अल्प प्रमाणात घेतले तरी त्याचा थेट परिणाम मानवी मेंदूवर होतो. यामुळे व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडू शकते तसेच गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

पोलिसांच्या तपासात शहरातील काही उच्चभ्रू भागांमध्ये तसेच तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये या ड्रग्सचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया आणि गुप्त नेटवर्कच्या माध्यमातून या ड्रग्सची विक्री होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू केला आहे.

डॉ. सिंघल यांनी पालकांना विशेष आवाहन करताना सांगितले की, मुलांच्या वागणुकीत अचानक बदल, अभ्यासाकडे दुर्लक्ष, चिडचिडेपणा किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ सतर्क व्हावे. नागपूरला ड्रग्जमुक्त करण्यासाठी नागरिकांनी आणि पालकांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या कारवाईनंतर शहरातील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी कोणते ड्रग्स जप्त केले?

    Ans: पोलिसांनी LSD ड्रग्स जप्त केले.

  • Que: LSD ड्रग्सचा परिणाम कुठे होतो?

    Ans: LSD ड्रग्सचा थेट परिणाम मेंदूवर होतो.

  • Que: पोलिसांनी पालकांना काय आवाहन केले?

    Ans: मुलांच्या बदलत्या वागणुकीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.

Web Title: Nagpur crime lsd drugs infiltrate nagpur major police crackdown amid rising concern over addiction among students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.