Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar Road Accident News: नंदुरबारमध्ये भाविकांवर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू १० जण गंभीर जखमी

अपघातानंतर आरडाओरडा आणि एकच गोंधळ उडाला. अनेक भाविक वाहनाखाली अडकले होते आणि स्थानिक रहिवाश्यांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. तोपर्यंत पोलिस पथक आणि स्थनिका ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 18, 2025 | 03:04 PM
Nandurbar Road Accident News:

Nandurbar Road Accident News:

Follow Us
Close
Follow Us:
  • भाविकांना घेऊन जाणारा पिकअप ट्रक चांदशैली घाटात अपघात़
  • अष्टंबा यात्रा पूर्ण करून त्यांच्या गावी परतत होते
  • लोक चिरडले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात अष्टंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणारा पिकअप ट्रक चांदशैली घाटात उलटला. एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते खोल दरीत कोसळल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, या दुर्दैवी अपघातात सहा यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला तर १० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. या घटनेने ग्रामीण भागात हादरून गेले आहे.

Chhagan Bhujbal News: जातगणनेची मागणी ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं

तीर्थयात्रेवरून परतताना हा अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व यात्रेकरू अष्टंबा यात्रा पूर्ण करून त्यांच्या गावी परतत होते. या प्रदेशात ही यात्रा एक धार्मिक कार्यक्रम मानली जाते आणि दरवर्षी हजारो लोक यात सहभागी होतात. घाट परिसरातील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे पिकअप उलटली, अशी माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की आत असलेले अनेक लोक चिरडले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर आरडाओरडा आणि एकच गोंधळ उडाला. अनेक भाविक वाहनाखाली अडकले होते आणि स्थानिक रहिवाश्यांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. तोपर्यंत पोलिस पथक आणि स्थनिका ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले होते. जखमांना ताबडतोब तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. गंभीर जखमी भाविकांना चांगल्या उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कोंडी सोडवण्यासाठी खुद्द पोलिस उपअधीक्षक उतरले रस्त्यावर

पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्यास सुरुवात

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली. घाटातील एका वळणावर वाहन वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले असावे आणि हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Web Title: Nandurbar road accident news attack on devotees in nandurbar 6 dead 10 seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 03:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.