Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी जुन्या वादाने जीव घेतलाच! तुर्भेत मध्यरात्रीच्या हल्ल्यातील इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू, १० आरोपीवर गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी तुर्भे परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला होता. मात्र, आज त्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 12, 2025 | 09:42 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई : एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील तुर्भे परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान या जखमीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष मोहन धुर्वे (वय 31) यांनी एपीएमसी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना दिनांक 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता घडली. आरोपींमध्ये विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाघमारे, विकी पाटीलची पत्नी चारुशिला, विद्वेष घरत, शकील, मौला आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर गंभीर हल्ला केला.

Raigad News: पोयनाड येथील भव्य रोजगार मेळावा, शेकडो तरुणांनी मिळवली रोजगाराची संधी

वाद मिटविण्याच्या बहाण्याने घरी बोलावून हल्ला

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपींनी जुन्या वादाचे कारण सांगत फिर्यादींना त्यांच्या घरी चर्चेसाठी बोलावले. मात्र वाद मिटविण्याऐवजी आरोपींनी हातात बॅट, फायबर रॉड आणि इतर घातक हत्यारे घेऊन फिर्यादी व त्याच्या मित्रांवर अचानक हल्ला चढवला. या दरम्यान किशोर वरड याच्या डोक्यावर बॅट आणि फायबर रॉडने हल्ला करून गंभीर दुखापत केली.

हल्ल्यानंतर किशोर वरड बेशुद्ध अवस्थेत कोसळला. त्याला तात्काळ वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत फिर्यादी आशुतोष धुर्वे यांच्या हातावरही बॅटने प्रहार करून फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे.

मोखाड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, निवडणूकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन

हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या स्कूटीचे हँडल, स्पीडोमीटर आणि मागील भागाचे नुकसान केले. त्यामुळे मालमत्तेची हानी झाल्याचेही पोलिसांना कळविण्यात आले आहे.

पोलिसांची तत्काळ कारवाई

घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी गंभीर मारहाण, दुखापत, मालमत्तेचे नुकसान आणि खून या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथके तयार करून आरोपींच्या शोधाला सुरुवात केली. पोलिसांच्या कारवाईत विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाघमारे आणि विद्वेष घरत या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असून पुढील तपास एपीएमसी पोलीस करत आहे.

पुढील तपास सुरू

या घटनेमुळे तुर्भे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Navi mumbai crime midnight attack in turbhet kishore varad dies during treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 09:41 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Raigad News: पोयनाड येथील भव्य रोजगार मेळावा, शेकडो तरुणांनी मिळवली रोजगाराची संधी
1

Raigad News: पोयनाड येथील भव्य रोजगार मेळावा, शेकडो तरुणांनी मिळवली रोजगाराची संधी

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
2

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Navi Mumbai: नवी मुंबई-ठाणे परिसरात सायबर फसवणूकचा प्रचंड प्रहार, एकाच दिवशी १ कोटींहून अधिक रुपये नागरिकांकडून उकळले
3

Navi Mumbai: नवी मुंबई-ठाणे परिसरात सायबर फसवणूकचा प्रचंड प्रहार, एकाच दिवशी १ कोटींहून अधिक रुपये नागरिकांकडून उकळले

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन
4

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.