मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप मागे घेण्यात यावेत आणि त्याने लेखी माफीही मागावी. यासोबतच त्याने भाऊ शमासुद्दीन आणि आलिया यांच्याकडून 100 कोटी रुपयांची भरपाईही मागितली आहे.या प्रकरणाची सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे. त्याचवेळी, याचिकेत नवाजने त्याचा भाऊ आणि पत्नी आलिया यांच्या वक्तव्यांवर आणि सोशल मीडियावरील सामग्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचे आरोप काय?
नवाजने याचिकेत काय आरोप केले आहेत ते पाहा…
भावाकडून पैशांची फसवणूक
नवाजने याचिकेत म्हटले आहे की, भाऊ बेरोजगार असल्याचे सांगितल्यामुळे 2008 साली त्याने आपल्या भावाची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती.अशा स्थितीत शमसुद्दीनने नवाजचे आयकर रिटर्न, ऑडिटिंग, जीएसटी फाइलिंग या सर्व गोष्टी पाहण्यास सुरुवात केली. शमसुद्दीनला नवाजचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, स्वाक्षरी केलेले चेकबुक, बँक पासवर्ड, ईमेल पत्ते देखील उपलब्ध होते, ज्याचा त्याने गैरवापर करून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
स्वतःच्या नावावर खरेदी केली मालमत्ता
नवाजुद्दीनने आपल्या भावावर याचिकेत आरोप केला आहे की, शमसुद्दीन त्याला सांगत होता की तो त्याच्या नावावर मालमत्ता खरेदी करत आहे, तर त्याने स्वतःच्या नावावर असे केले आहे.या मालमत्तांमध्ये यारी रोड येथील फ्लॅट, अर्ध व्यावसायिक मालमत्ता, बुढाणा येथील शाहपूर येथील फार्म हाऊस आणि दुबईतील मालमत्तेचा समावेश आहे.नवाज सांगतात की, कामात व्यस्त असल्यामुळे या सर्व गोष्टींची चौकशी करायला वेळ मिळाला नाही.
आलियाला भडकवले
नवाजने पुढे सांगितले की, हळूहळू जेव्हा त्याला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने शमसुद्दीनला विचारले पण उत्तर मिळाले नाही आणि शमसुद्दीनने आलिया सिद्दीकीला भडकवायला सुरुवात केली.
आलिया आधीपासून होती विवाहित
नवाजनेही आलियावर एक गंभीर आणि मोठा आरोप केला आहे.नवाज म्हणतो की, आलिया म्हणजेच अंजना आधीच विवाहित होती, परंतु तिने हे कधीही अभिनेत्याला सांगितले नाही आणि नेहमीच सांगितले की ती अविवाहित आहे.
21 कोटींची फसवणूक
नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि आलियावर 21 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.