Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! पत्नीची हत्या करून नंतर पतीने स्वतःलाही संपवलं; अमरावती येथील धक्कादायक घटना

प्रज्वल पाथरे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2025 | 11:06 AM
वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाल्याची घटना रविवारी (दि.23) घडली. ही धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः सुद्धा आत्महत्या करून जीवन संपवले.

हेदेखील वाचा : Cyber ​​Crime: “माझ्या लग्नाला या”, निमंत्रण पत्रिका उघडताच बँक खाते रिकामे झाले, काही क्षणातच ७५ हजार रुपये गायब

अमोल सुरेश गायकवाड (वय 35), शिल्पा अमोल गायकवाड (वय 32, दोन्ही रा. रहाटगाव) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील मूळ कारण अद्याप पुढे आले नाही. त्यामुळे नांदगाव पेठ पोलिस सर्वच बाजूने तपास करत आहे. मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा व सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल गायकवाड आणि रामगाव येथील शिल्पा गायकवाडचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता.

प्रज्वल पाथरे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते.

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. महिलेच्या डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या घटनेच्या अनुषंगाने सद्यास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

श्वान पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेंद्र अंभोरे यांनी तत्काळ पोलिसांचा ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. त्यानंतर श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला सुद्धा यावेळी पाचारण करण्यात आले. पोलिस उपायुक्त सागर पाटील, फ्रेजरपुरा विभागाचे एसीपी कैलास पुंडकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून शिल्पा व अमोल यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.

सुसाईड नोट मिळाली

अमोलने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये आई-वडिलांना सांगितले की, ‘मीच जबाबदारी आहे, मीच गुन्हेगार आहे, मला माफ करा’, असे लिहून ठेवले आहे. त्यामुळे कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे दिसून येत आहे.

हेदेखील वाचा : Dhule News: प्रेम प्रकरणातून तरुणाची बेदम मारहाण, मग निर्घृण हत्या; फेकून दिले नाल्यात, शिरपूर तालुका हादरला

Web Title: One man committed suicide after murder his wife nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • Amravati crime
  • Amravati Murder Case

संबंधित बातम्या

Amravati crime: अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला; लूटमार करून पीडिताला रस्त्याच्या कडेला फेकला
1

Amravati crime: अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला; लूटमार करून पीडिताला रस्त्याच्या कडेला फेकला

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त
2

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त

Amravati Crime News: अमरावतीतील अघोरी अंधश्रद्धेचा कहर; १० दिवसांच्या बाळाला गरम विळ्याचे ३९ चटके; संतापाची लाट
3

Amravati Crime News: अमरावतीतील अघोरी अंधश्रद्धेचा कहर; १० दिवसांच्या बाळाला गरम विळ्याचे ३९ चटके; संतापाची लाट

निवृत्त पोलीस जमादाराने उचललं टोकाचं पाऊल; घरात सापडली चिठ्ठी….
4

निवृत्त पोलीस जमादाराने उचललं टोकाचं पाऊल; घरात सापडली चिठ्ठी….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.