संग्रहित फोटो
हेमंत दाभाडे हे वाळूज येथील बजाज कंपनीत गेल्या सुमारे ३० वर्षांपासून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते दररोज वैजापूर-वाळूज असा प्रवास करत होते. सोमवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे लक्झरी बसने नोकरीसाठी निघाले होते. मात्र, हडसपिंपळगावजवळ बसने कंटेनरला धडक दिली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्र. (युके ०८ सीबी ७६६०)समृद्धी महामार्गावरुन जात असताना अहमदाबादहून लातूरच्या दिशेने जणाऱ्या खासगी बसने (क्र. एआर २० ए ९२९२) त्याला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, बसमधील हेमंत दाभाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्ग प्रशासनाची यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुटुंबावर शोककळा
हेमंत दाभाडे यांच्या निधनाची वार्ता वैजापूरमध्ये पोहोचताच कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
अपघातातील दहा जखमींची नावे
या अपघातात शिवलिंग सुभाष खेडे (वय ६५), चंद्रकांत मोहन देवपूते (वय २२), सतीश राजू लिपणे (वय ४२), कौस्तुभ गंगाधर शिनगारे (वय २४), प्रांजल जितेंद्र सोनार (वय २८), जितेंद्र नरेंद्र सोनार (वय ३५), विश्वजीत अरुणकुमार गवळे (वय १२), सुनील लालमसिंग सोनवणे (वय ४५), संदीप ब्रिजवाल वसईकर (वय ३५) आणि लालचंद भीमालाल मेघवाल (वय ३०) हे जखमी झाले आहेत. सर्वांवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघाताचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.






