Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृह, कॅन्टीन आणि असुविधांच्या तक्रारींसंदर्भात प्राचार्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, प्राचार्यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते.
ते पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी लावण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर लगेच उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या ठिकाणाहून खाली उतरवले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेनंतर पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ मनसैनिकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यातील राजकारण तापले असतानाच, पोलिसांनी मध्यरात्री कनोजिया आणि भिलारे यांन अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचा सूर उमटत आहे. पुणे पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली
कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनसे कार्यकर्त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणून प्राचार्यांना व तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. महाविद्यालयाच्या परिसरात आणि प्राचार्यांच्या केबिनमध्ये विनापरवानगी बेकायदेशीरपणे प्रवेश करून घोषणाबाजी अमित ठाकरेंसह दोन मनसे कार्यकर्त्यांवर आरोप असा आहे. राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमित ठाकरेंच्या सह २० ते २५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमित ठाकरेंना अद्याप अटक झालेली नसली तरी, त्यांना त्यांना पोलीस चौकशीची नोटीस पाठवली जाऊ शकते. तर इतर दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि घोषणाबाजी करणे या कलमांतर्गत पोलिसांनी ही कारवाई केलीआहे.






