Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchgani Crime: पाचगणीत बारबालांचा पुन्हा धिंगाणा; 20 जणांना बेड्या, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी मारलेल्या छाप्यात साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण २५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 10, 2025 | 06:52 PM
Panchgani Crime: पाचगणीत बारबालांचा पुन्हा धिंगाणा; 20 जणांना बेड्या, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

Panchgani Crime: पाचगणीत बारबालांचा पुन्हा धिंगाणा; 20 जणांना बेड्या, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

वाई: पाचगणी जवळील कासवंड येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) येथे बारबालांचा धिंगाणा चालू असताना पोलिसांनी मारलेल्या छाप्यात २० जणांना ताब्यात घेऊन २४ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सातारा जिल्ह्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळाची बिरुदावली मिरवणाऱ्या पाचगणीत असे अवैध धंदे रोजरोसपाने सुरु असून यावर वचक म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी धडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस दलाला दिल्या होत्या.

त्यानुसार पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील हॉटेल हिराबागच्या हॉलमध्ये गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालक यांनी वेगवेगळया ठिकाणाहुन १२ महिला आणल्या असून त्या गाण्यांच्या तालावर अश्लिल हावभाव करत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व त्याचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले. पाेलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले असून हॉटेल मालकासह २० जणांवर गुन्हा दाखल केला. छाप्यात साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण २५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात अाले. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार तापस करीत आहेत.

तोकड्या कपडयात अश्लील नृत्य
पाचगणी येथील हॉटेल हिराबागचे (बिलीव्ह) हॉलमध्ये छापा टाकून हॉटेलच्या हॉलमध्ये जाऊन पाहिले असता १२ बारबाला तोकड्या कपडयात तेथे अश्लील हावभाव करुन हॉटेलमधील ग्राहकांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी लगट करीत असल्याचे दिसून आले. या बारबालासमवेत हॉटेलमधील ग्राहक नृत्य करीत होते.

साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरातील पार्टीत बारबालांचा नाच

 

सातारा जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच पार्टी झाली. या पार्टीत बारबाला देखील नाचवल्या गेल्या आहेत.यावेळी झालेल्या राड्यात आणि मारामारीत ३ जण जखमी झाले आहेत.  सध्या मोठ्या शहरांमध्ये रंगीत-संगीत पार्ट्यांचे पेव्ह फुटले आहे. अनेकदा पोलिसांकडून अशा पार्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली जाते, तर कधी अशा पार्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देखील होते.

हेही वाचा: साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरातील पार्टीत बारबालांचा नाच; Video Viral, अद्याप कारवाई नाही

त्यामुळे, महिला नाचवत किंवा बारबाला घेऊन काही ठिकाणी पार्ट्या केल्या जातात. सातारा जिल्ह्यातही अशाच एका पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही पार्टी रंगली होती.  ही पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला. आणि त्याचे रुपांतर कोयते, तलवारी नाचवण्यात गेले. यामध्ये काही गाड्या फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी फुटली तर काहींच्यावर कोयत्याने वार झाले. अंमली पदार्थ आणि दारू पिवून झालेल्या भांडणात दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. या रेव्ह पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडांनेच सोमवारी दुपारी झालेल्या नुकसानीची भरपाई दिल्याचे समजते. हॉटेलच्या फुटलेल्या काचांचे नुकसान भरुन देण्यात आले आहे.

 

Web Title: Pachgani police raid hirabag hotel because illegal barbala dance and arrested 20 persons crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 08:44 PM

Topics:  

  • Pachgani

संबंधित बातम्या

Pahalgam Terror Attack : पाचगणी टेबल लँड बंद ; पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
1

Pahalgam Terror Attack : पाचगणी टेबल लँड बंद ; पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.