Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर ‘PMPML’ अलर्ट; महिला सुरक्षेसाठी नव्या उपाययोजना लागू

स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीएमपी प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.या पार्श्वभूमीवर बस स्थानकांवर विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यास सुरूवात झाली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 05, 2025 | 12:16 PM
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर ‘PMPML’ अलर्ट; महिला सुरक्षेसाठी नव्या उपाययोजना लागू
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएमएल प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे.महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही दिवसांपूर्वीच पालिकेकडून बसस्थानकांवर सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता पीएमपीएमएलने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन आदेशानुसार, सार्वजनिक बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिल्यास, बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात बस घेऊन जाऊन तक्रार नोंदवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी ! हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं; कारण देत म्हटलं…

स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीएमपी प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर बस स्थानकांवर विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येत आहेत.या नव्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अधिक सक्षम CCTV कॅमेरे, महिला प्रवाशांसाठी विशेष सुरक्षा रक्षक, तसेच रात्रीच्या वेळी महिलांसाठी खास बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांना अधिक सुरक्षित आणि संरक्षित वातावरण मिळावे, असा पीएमपी प्रशासनाचा प्रयत्न आहे.

महिलांसाठी आरक्षित जागांवर पुरुष बसल्यास कठोर कारवाई  

सार्वजनिक वाहतुकीमध्ये महिलांसाठी आरक्षित जागांवर टवाळखोर पुरुष प्रवासी बसण्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अधिकार मिळावा यासाठी पुणे महापालिका परिवहन मंडळ (पीएमपी) प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.या नव्या नियमांनुसार, महिलांसाठी आरक्षित जागांवर पुरुष प्रवासी बसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित होणार असून, अशा प्रकारच्या वादविवादांवर नियंत्रण मिळवता येईल. पीएमपी प्रशासनाचा हा निर्णय सार्वजनिक वाहतुकीतील महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यास मदत होईल.

 पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेसंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्या मागील दोन वर्षांच्या हालचालींचा सखोल तपास करत त्याचा तांत्रिक रेकॉर्ड मिळवला आहे. या तपासात गाडे केवळ स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनच नव्हे, तर शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर बसस्थानक परिसरातही मुक्तपणे वावरत असल्याचे आढळले आहे.

Web Title: Pmpml implements new measures for womens safety after swargate incident nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • PMPML

संबंधित बातम्या

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
1

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.