पिंपरी चिंचवड: वारकरी सांप्रदायासाठी विशेष ओळख असलेल्या देवाच्या आळंदीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी शिक्षण संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पाहणे म्हणून आलेल्या एका नराधमाने दोन मुलींवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्याही ठोकल्या. ही घटना ताजी असतानाच देवाच्या आळंदीतच वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलही आळंदीमधील चऱ्होली खुर्द रस्त्यावर असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेतील एका महाराजच गेल्या चार महिन्यांपासून 13 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण करत होता. 15 सप्टेंबर 2024 ते 23 जानेवारी 2025 या चार महिन्याच्या काळात आरोपीने अनेकदा मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. 23 तारखेलाही आरोपीने मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.
Jalna Crime: धक्कादायक! जालन्यात भर रस्त्यात तरूणाने स्वत:लाच पेटवून घेतले
त्यानंतर पीडित मुलीने आणि आईने आळंदी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी 33 वर्षीय किरण महाराज ठोसर याला अटक केली आहे. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे आळंदी पोलिसांनी आरोपीवर पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी या घटनेचा पुढील तपासही सुरू केला आहे. दरम्यान, 15 दिवसांपूर्वीही या शाळेत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता हे नवीन प्रकरण समोर आल्याने वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेतही विद्यार्थी सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला 15 लाखांना गंडा
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची सायबर चोरट्यांनी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर फरासखाना पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत 38 वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Satara Crime : सातारा पोलिसांची मोठी कारवाई, सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मंगळवार पेठेत राहायला आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महिलेच्या मोबाइलवर चोरट्यांनी मॅसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. नंतर महिलेने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात काही रक्कम भरली. चोरट्यांनी महिलेला प्रथम परतावा दिला. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला.