Crime: निराधार महिलेचा आणि मुलीचा विनयभंग; त्यानंतर आरोपीने थेट..., ॲट्रॉसिटी व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
बारामती: निराधार महिलेच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत नंतर तीला व तिच्या मुलीचा विनयभंग करुन तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित उर्फ अनंत विजयकुमार शहा (रा. जुना मोरगाव रोड शेजारी, चव्हाण एको व्हीलेज फ्लॅट क्र बी वन -१०,बारामती) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,४० वर्षीय पिडीत महिला तीच्या १२ वर्षीय मुलीसह बारामती शहरात एका इमारतीत राहत आहे. सदर महिलेची गेल्या काही दिवसांपुर्वी अभिजीत उर्फ अनंत शहा याच्याशी ओळख झाली. तेव्हापासून ते दोघे एकत्र राहत होते. मात्र दोघांचे सतत वाद होत असल्याने पीडित महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानुसार भा. द. वि कलम ३७६,३७७,५०६ सह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हा न्यायप्रविष्ठ आहे. रात्री साडेदहा वाजता सदर महिला तिच्या मुलीसह राहत असलेल्या ठिकाणी आरोपी दारू पिऊन आला. त्याने पीडित महिलेला व तिच्या अल्पवयीन मुलीला जातीवाचक शिवीगाळ करत दोघींचा विनयभंग केला. त्याचबरोबर दोघींनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अभिजीत उर्फ अजय अनंतकुमार शहा याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड हे करत आहेत. बारामती शहर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियमाने व अॅट्रॉसिटी ( अनुसूचित जाती जमाती अत्याचार आधीनियामा अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, खालच्या जातीच्या बाया वेश्याव्यवसाय करण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून निराधार महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला असे दोन्ही मायलेकींना आरोपी यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली यासोबतच जर पोलिसात तक्रार दिली तर तुम्हा दोघींना जीवे मारून टाकीन.
पोलीस माझ्या खिशात आहेत पोलीस माझं काय वाकड करू शकणार नाहीत अशीही धमकी दिली. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार अधिनियमाने व अॅट्रॉसिटी ( अनुसूचित जाती जमाती अत्याचार आधीनियामा अंतर्गत), तसेच जीवे मारण्याची धमकी देणे, विनय भंग करणे या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापानेच केली 9 वर्षीय चिमुकल्याची हत्या
बारामती तालुक्यातील होळ येथील जन्मदात्यानेच पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा नीट अभ्यास करत नसल्याचा राग आल्याने मुलाची हत्या केल्याची घटना घडली. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली असून त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.