Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirdi Saiaba Temple Threat: शिर्डी साई समाधी मंदिर धमकी अपडेट; मंदिर प्रशासनासह पोलीस अलर्टवर

शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा संस्थानला अलीकडेच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणा तत्काळ सज्ज झाल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 04, 2025 | 03:38 PM
Shirdi Saiaba Temple Threat: शिर्डी साई समाधी मंदिर धमकी अपडेट; मंदिर प्रशासनासह पोलीस अलर्टवर
Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला २ मे रोजी सकाळी एक ई-मेलद्वारे साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे मंदिर परिसरासह संपूर्ण शहरातही खळबळ माजली आहे. दुसरीकडे धमकीचा मेल आल्यानंत साई संस्थान आणि पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. तत्काळ मंदिर परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.सध्या मंदिर परिसरात काटेकोरपणे भाविकांची प्रवेशपूर्व तपासणी केली जात आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू मंदिरात जाऊ नये यासाठी प्रवेशद्वारांवर कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची कसून तपासणी केली जात असून, पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी परिसरात सातत्याने गस्त घालत आहेत.

यासोबतच शिर्डी पोलिसांकडून धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, याचा तपास सुरु असून, या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर सेलचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या पर्यटक व भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शनिवारी (3मे) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना पाईप बॉम्बसदृश बॉम्बने मंदिर उडवण्याच्या धमकीचा मेल मिळाला. या मेलमुळे सुरूवातील मंदिर प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी सुत्रे फिरवत तपास सुरू केला.

Shirdi Saibaba Temple Threat: धक्कादायक! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मंदिरासह आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची काटेकोर तपासणी सुरू केली. या मेलच्या पार्श्वभूमीवर संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी तत्काळ शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साई मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, प्रत्येक भाविकाची प्रवेशद्वारावरच तपासणी करण्यात येत आहे. पोलीस आणि सुरक्षा रक्षक परिसरात सातत्याने गस्त घालत आहेत.

दररोज हजारो भाविक साई मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने, अशा प्रकारच्या धमकीचा मेल अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. हा मेल फक्त खोडसाळपणा आहे की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे. साई संस्थान आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून, तपास प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Ahmednagar Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुरूंग? बड्या नेत्याने घेतली राम शिंदेंची भेट

नेमकं काय झाल होतं शनिवारी?

शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा संस्थानला अलीकडेच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणा तत्काळ सज्ज झाल्या आहेत.प्राप्त माहितीनुसार, संस्थानच्या अधिकृत ईमेलवर किंवा दूरध्वनीवर बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली होती. धमकी मिळताच स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोध पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण मंदिर परिसराची कसून झडती घेण्यात आली आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना राबवण्यात आल्या.

Web Title: Police on alert along with temple administration after shirdi sai samadhi temple threat case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • shirdi news

संबंधित बातम्या

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
1

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार
2

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार

Shivsena News: अकोलेत चक्क ‘पक्षप्रवेश घोटाळा’! बोगस यादीमुळे शिंदे गट अडचणीत, नगरमधील पक्ष प्रवेशावर संशयाची सावली
3

Shivsena News: अकोलेत चक्क ‘पक्षप्रवेश घोटाळा’! बोगस यादीमुळे शिंदे गट अडचणीत, नगरमधील पक्ष प्रवेशावर संशयाची सावली

शिर्डी हादरली! वाढदिवस साजरा करण्यासाठी 7 अल्पवयीन मुलांनी  एका ४२ वर्षीय तरुणाचे आधी अपहरण केले, नंतर खून केला, त्यानंतर….
4

शिर्डी हादरली! वाढदिवस साजरा करण्यासाठी 7 अल्पवयीन मुलांनी एका ४२ वर्षीय तरुणाचे आधी अपहरण केले, नंतर खून केला, त्यानंतर….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.